भाषावार प्रात रचना - Page 477

भाषावार प्रांत रचना | ४३५

वारंगळ राजधानी बनण्यालायक शहर आहे. आंध्राची ती प्राचीन काळची राजधानी होती. ते रेल्वेचे जंक्शन आहे. शिवाय या शहरात पुरेशा इमारतीही आहेत. पण हें शहर आंध्राचा भाग अंसला तरी तें आज हैद्राबाद संस्थान मध्ये मोडत आहे. तत्वतः हैद्राबाद संस्थान मोडून त्याच्यातील आंध्राचा भाग मिळून नवा आंध्र प्रांत बनला पाहिजे. पंतप्रधानांचा हैद्राबाद संस्थान मोडण्यास काही स्वार्थ असला तरी निदान हैद्राबादचा आंध्रापुरता काहीं माग काढून घेऊन वारंगळ राजधानी बनविण्याचा मार्ग मोकळा करून द्यायला काय हरकत आहे आणि असा परराज्यांतील तुकडा काढून घेणे ही भारताला नवीन गोष्ट नाही. परंतु, पंतप्रधानांना हैद्राबाद आणि काश्मीर या दोन्ही संस्थानांबाबत ईश्वराज्ञेच्या'उलटच वर्तन करावयाचें आहे. पण माझी खात्री आहे की, लवकरच याचे दुष्परिणाम पंतप्रधानांना स्वतःच्या डोळ्यांनी पहावे लागतील j

हे थोडे विषयांतर झालें. माझा मुद्दा आहे तो राज्य आर्थिकदृष्ट्या स्वयंसिद्ध पाहिजे आणि भाषावार प्रांतरचना करताना हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे. .. दुसरा. मुद्दा असा आहे की, भाषावार प्रांत बनतांना होणाऱ्या संभाव्य इष्टानिष्ट घटनांची पूर्व जाणीव असणे. दुर्दैवाने हिंदुस्थानातील लोकवस्तीचे जन्म-मृत्यू, जाती-वंश यांचा तपशीलवार आढावा या वर्गीकरणाप्रमाणे अचूक संशोधन आणि समीक्षण करणांरा अभ्यासू विद्यार्थी नाही. आमच्या दशवार्षिक खानेसुमारीच्या अहवालावरून मुसलमान कितीं, हिंदू किती, अस्पृश्य किती, ज्यू किती आणि [ख्रिश्‍चन ] किती अशाच प्रकारची माहिती मिळतें. देशामध्यें एकंदर धर्म क्रिती एवढीच माहिती मिळाल्यानें कांही कार्यभाग होत नाही. , आम्हांला माहिती पाहिजे ती ही की, प्रत्येक भाषिक विभागामध्ये जातिविभागणी कशी आहे. पण याबाबत आपल्याला थोडीच माहिती उपलब्ध आहे आणि त्यामुळें स्वतःच्या ज्ञानावर व माहितीवर एकाद्याला अवलंबून राहावें लागतें. प्रांतात बहुधा एक दोन जातीचें संख्या प्राबल्य असते आणि बाकीच्या जाती अगदीच अल्पसंख्यांक असतात. त्या बहुसंख्य जमातीवर अवलंबून असतात असे म्हटले तर तें वावगे होणार नाहीं

उदाहरणादाखलच बोलायचे झाले तर पंजाब मधील पेप्सू प्रांताचे पहा. तेथें जाटांचे संख्या प्राबल्य आणि तेथील अस्पृश्य सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असतात. आंध्रमध्ये दोन किंवा तीन जाती सर्वत्र प्रामुख्याने आढळतात. रेड्डी कम्मा आणि eq या त्या जाती होत. जमिनदारी, सरकारी नोकऱ्या व्यापार-उद्योग या सर्व बाबतींत तेच स्वामित्व गाजवितात आणि अस्पृश्यांना तिथे दुय्यम परावलंबी स्थान आहे. महाराष्ट्राचेच घ्या. महाराष्ट्राच्या खेडोपाडी मराठ्यांची अफाट वस्ती आहे. ब्राह्मण, गुजर, अस्पृश्य आणि कोळी हे दुय्यम