भाषावार प्रात रचना - Page 478

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ४३६

की ब्राह्मण बनिया लोक स्थान धरून आहेत. एक काळ असा होता जेव्हा आणि

आहे. गांधीजींच्या खूनानंतर निर्भयपणें राहात. पण तो काळ आता पालटला

ब्राह्मण आणि बनिया लोक मराठ्यांच्या प्रकोपाला भिऊन खेड्यापाड्यांतून जीव घेऊन पळाले आणि शहरांचा आसरा त्यांनी केला आणि दुर्दैवी अस्पृश्य, कोळी आणि माळी हे लोक मराठ्यांची मगरूरी आणि जुलूम सहन करीत जीवन कंठीत आहेत आणि त्यांना ह्या चमत्कारीक जाति-रचनेची जाणीव नाही त्या प्रत्येकाला हा जाच सहन करावाच लागेल. भाषावार प्रांतरचनेमध्ये अल्पसंख्यांक ज्ञातींना काय आधार आहेत ? त्यांना कायदेमंडळात निवडून येण्याची काही आशा आहे का ? त्यांना आर्थिक प्रगतीची अपेक्षा करता येईल कां ? प्रांतिक सरकारातून नोकऱ्या चाकऱ्या मिळण्याची शक्यता आहे का ? या अशा परिस्थितीत भाषावार प्रांतरचना म्हणजे बहुसंख्य ज्ञातीच्या हातीं ' स्वराज्य ' देण्यासारखे आहे. गांधींच्या स्वराज्याची ही काय स्थिती बरं !

ज्यांना ह्या प्रश्‍नाची बाजू बरोबर उमगली नाही त्यांना भाषावार प्रांतरचना असा शब्दप्रयोग समजणार नाही. उलट, अशा प्रांतांना जाट प्रांत, रेड्डी प्रांत किंवा मराठा प्रांत असे म्हटल्यावरच बरोबर समजूं शकेल.

तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे एकच भाषा बोलणाऱ्या लोकांचा. एका प्रांतात समावेश केल्यावर त्यांच्यांत एकसंघपणा निर्माण होईल कां? सगळे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रांत एकसंघ होतील कां? सगळे आंध्र आंध्रप्रदेशात समाविष्ट होतील का ? या एकसंघपणाचा अर्थ एक नवीन घटक निर्माण करणे असा नव्हे. उत्तर प्रदेश, बिहार, पं. बंगाल या प्रांतांतील एकसंघपणाशीं त्यांचा संबंध पोचतो. उत्तर प्रांताप्रमाणें हिंदी बोलणाऱ्या सर्वाचा एक-समुचय प्रांत का असू नये ? पण जे या एकसंघपणाचा पाठपुरावा करतात त्यांना दुसऱ्या प्रांताबरोबर झगडा निर्माण करावयाचा आहे का ? आणि प्रत्येकाने आपण कुणी स्वतंत्र आहोत, दुसऱ्याहून भिन्न आहोत असा या एकसंघपणाचा अर्थ करून

घेतला तर थोड्याच कालावधीत मौर्य साम्राज्यभंगाप्रमाणे आजच्या हिंदुस्थानचीही weet होतील. i |

त्याचां अर्थ असा नव्हे की, भाषावार प्रांतरचनेच्या मागणीला कांही बाजू

नाहीं. भाषावार प्रांताच्या बुरख्याखाली त्या त्या प्रांतांतील बहुसंख्य ज्ञातीकडून

भाषावार प्रांतरचनेच्या हेतुचा मुडदा पडू नये म्हणून योग्य ती निश्चित स्वरुपाची खबरदारी आणि समतोलपणा राखण्यासाठी सूचना आहे.

०००

जनता : ता. २ मै १९५३.