रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 479

११४
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

डॉ. बाबासाहेब आंबेडकर येवले येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी प्रतिज्ञा करताना म्हणतात, “ दुर्दैवाने अस्पृश्य-हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. . . . मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.” त्यानंतर त्यांनी कोणता धर्म स्वीकारावा या दृष्टीने अनेक धर्मांचा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास सुरू ठेवला. या दरम्यान त्यांनी ' स्वतंत्र मजूर पक्ष ' आणि ' अ. भा. शेख्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशस ' या दोन राजकीय पक्षांची स्थापना केली. सर्व धर्मांच्या परिक्षणांती त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निश्‍चय केला आणि तशा स्वरूपाचे निवेदन तारीरथ २० ऑगस्ट १९५५ च्या जनतेच्या अंकात प्रसिद्ध केले.

बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर जातिवाचक ' शेड्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशन ' हा राजकीय पक्ष ठेवता येणार नाही या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व- समावेशक अशा राष्ट्रीय नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा विचार करीत. होते. याबाबत जनता, तारीख १० डिसेंबर १९५५ मध्ये प्रसिद्ध त्यांची खालील भूमिका बोलकी आहे

” औरंगाबाद येथे डिसेंबर १९५५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजारी अवस्थेत होते. त्या दरम्यान ते म्हणाले, माझा ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' हा एक नवा राजकीय पक्ष काढण्याच्या विचार आहे. भारतीय राज्यघटना खऱ्याखुऱ्या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यांत येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय समानता, स्वातंत्र्य व बंधुभाव असे राहणार आहे..

भारतांतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षात एकीकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील.

भारतांतील व्यापारी वर्गानें अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षास आर्थिक सहाय्य केल्यास दोनही पक्ष मजबूत पायावर कार्य करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस फार मोठे सहाय्य होईल.