रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 480

४३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लहानसहान पक्षाजवळचें मामुली निधी, कार्यकर्त्यांची वाण या गोष्टी लक्षांत घेतां सध्याच्या राजकीय वातावरणांत अशा पक्षांना बिलकूल भविष्य काळ नाही ' असें डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत आहे.

सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्ष अशा दोन पक्षांच्या वाढीस प्रोत्साहन द्यावे असेही त्यांना वाटते.

उदाहरण देण्यासाठी ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत शेड्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशनला थोडे हजार रुपयेही खर्च करतां आले नाहींत. याच्या उलट कॉँग्रेसने शेड्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशनचा पाडाव करण्यासाठी अमाप पैसा खर्च

केला. " १

या दृष्टीने तारीख ३० सप्टेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेतखाली त्यांच्या निवासस्थानी ' अ. भा. शेड्यूल्ड कास्टस्‌ फेडरेशन ' च्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आणि त्यात ठरावाद्वारे ' अ. भा. रिपब्लिकन पार्टी ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीचा वृत्तांत प्रबुद्ध भारताच्या तारीख ६ आणि १३ ऑक्टोबर १९५६ च्या अंकात प्रसिद्ध झाला. तो खालीलप्रमाणे-

” अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या कार्यकारणीची बैठक दिल्ली येथे तारीख ३०, सप्टेंबर .१९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या निवासस्थानी भरली होती. भारतांतील निरनिराळ्या प्रदेशांतील दलित फेडरेशनच्या कार्यकारिणीचे सभासद हजर होते. कार्यकारिणीत चालू राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली व निरनिराळया विषयानुसार ठराव सम्मत करण्यांत आले. . दलित फेडरेशन या राजकीय पक्षाऐवजी, ' अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ' या नावाचा राजकीय पक्ष स्थापण्याचा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस व्यतिरिक्त पक्षाशी सहकार्य

सम्मत झालेल्या ठरावामध्ये एक ठराव, काँग्रेस व्यतिरिक्त असलेल्या पक्षाबरोबर आगामी सार्वत्रिक निवडणुकांत सहकार्य करण्याबद्दलचा आहे. त्या ठरावांत असें नमूद करण्यांत आले की, काँग्रेस पक्षाशिवाय, इतर कोणत्याही राजकीय पक्षास, अ. भा. दलित फेडरेशनबरोबर, निवडणुकाबाबत संधी करावयाचा असेल तर फेडरेशन त्या गोष्टीस तयार राहील. अशा निवडणुका संधी बाबत, काय अटी व मुद्दे असावेत याचा विचार, काँग्रेस व्यतिरिक्त पक्षाबरोबर. करील. |

`. जनता, ता. १० डिसेंबर १९५५.