सामाजिक परिषद - Page 48

६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे * अध्यक्ष या नात्याने बॅरिस्टर जयकर यांनीं जे भाषण t केलें तें या दृष्टीनें मननीय आहे. या भाषणांत बॅरिस्टर जयकरांनीं समाज सुधारणेचा आतांपर्यंतचा इतिहास सांगितला व आज ही चळवळ कोणत्या अवस्थेप्रत येऊन पोचली आहे हेंही निर्दिष्ट केलें. बॅ. जयकर हे नुस्ते सुधारक नसुन त्यांच्यांत सत्यशोधकी पाणी आहे हैं या ठिकाणी सिद्ध झालें. तसें नसतें तर इतर सुधारकांप्रमाणे त्यांना अस्पृश्य व ब्राह्मणेतर या चळवळींचे रहस्य जाणतां आलें नसतें. पण त्यांनीं तें जाणलें आहे व समाजसुधारणेच्या इतिहासांत या चळवळींचे महत्त्व केवढें आहे हेही त्यांना समजलें आहे. आगरकरकालीन सुधारणेची व्याप्ति व या चळवळींची व्याप्ति यांतील फरक त्यांनीं जाणला आहे; व या चळवळींचे बाह्य स्वरूप कोणाला कितीही अप्रिय असलें तरी त्यांच्या अंतरंगीं समाज समतेची तीव्र तळमळ भरलेली आहे हेंही त्यांनीं पाहिलें आहे. बॅ. जयकर टिळक-चिपळूणकर परंपरेंत वावरत असले व आपली राजकीय मतें त्यांनीं त्या परंपरेला विकली असलीं, तरी त्यांचीं सत्यशोधकी सामाजिक मतें त्यांच्या या भाषणावरून स्पष्ट होतात. किती झाले तरी ते ब्राह्मणेतर आहेत. सामाजिक विषमतेची आंच त्यांना केव्हांना केव्हां लागली असणारच; व त्यामुळेंच त्यांनीं असें भाषण केलें तर नवल नाहीं. या भाषणांत असावी तितकीं भावनेची तीव्रता व जिव्हाळ्याची उत्कटता नाहीं. पण राजकारणी लोकांना समाजसुधारणेची आवश्यकता पटत चालली आहे असें जें बॅ. जयकर यांनीं म्हटलें आहे त्याचें हें भाषण स्पष्ट निदर्शक आहे. त्यांनीं सुचविलेली समाजसुधारणेसाठीं सरकारी कायद्याची आवश्यकता राजकारणी लोकांच्या बदलत्या दृष्टीकोणाचें गमक

आहे. "१

७७७
  1. राजकीय प्रगतीसारखेच सामाजिक सुधारणांसंबंधी कॉग्रेसच्या अधिवेशनात विचारविनिमय व ठराव करण्यात यावेत असा दृष्टीकोन असणारे काही गृहस्थ होते. सामाजिक परिषद काँग्रेसच्या अधिवेशनात दरवर्षी भरवावी असा त्यांनी विचार मांडला व कॉँग्रेसच्या सूत्रधारांनी तो मान्य केला. १८८७ च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन मद्रासला भरले, तेव्हा त्यात सामाजिक परिषद पहिल्यांदा भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्ष राजा सर टी. माधवराव हे होते. १८८७ पासून १८९४ पर्यंत या परिषदा कॉग्रेसच्या मंडपात भरविण्यात आल्या. १८९५ चे अधिवेशन पुण्यात भरविण्याचे ठरले तेव्हा सामाजिक परिषदेचे अधिवेशन काँग्रेसच्या मंडपात भरू द्यावयाचे नाही असा पुण्यातील जीर्णमतवाद्यांनी चंग बांधला. त्यावेळी टिळकांनी त्यांची बाजू घेऊन व अनेक युक्त्या प्रयुक्त्या योजून सामाजिक परिषद भरवू इच्छिणाऱ्या सुधारकांना हैराण केले. सामाजिक परिषदेच्या मंडपाला आग लावू व सुधारकांना बडवून काढू अशाही जाहीर धमक्या दिल्या गेल्या. सुधारकांचे अग्रणी न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले वगैरे पुढाऱ्यांनी संयम राखून माघार घेतली व सालाबादाप्रमाणे काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद न भरता ती पोलीस संरक्षणात वेगळी भरविली गेली: तेव्हापासून सामाजिक परिषदा वेगळ्याच भरविल्या जाऊ लागल्या.

+: पाहा, परिशिष्ट क्र. १.

' . प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ जानेवारी १९२९.