४४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे नियोजित धम्म दिक्षेकरिता आले असताना तारीख १३ ऑक्टोबर १९५६ रोजी वृत्तपत्र वार्ताहरांबरोबर त्यांची जी मुलाखत झाली ती खालीलप्रमाणे--
प्रश्न : धर्मातरानंतर शेड्युल्ड कास्टस फेडरेशनचे काय होणार ?
उत्तर : कदाचित तो कायम राहील किंवा नवा पक्ष स्थापन होईल. मी मात्र बौद्ध धर्मांत प्रवेश केल्यानंतर शेड्युल कास्टस् फेडरेशनचा सदस्य राहणार नाही.
प्रश्न बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आपण काय करणार ?
उत्तर : मी ' मिशनरी ' होणार आहे, पण राजकारणाचा संन्यास मात्र घेणार नाही, निवडशणुकीलाही निश्चितपणे उभा राहीन.
प्रश्न : रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे आपण निश्चित केले आहे काय ?
उत्तर: हो, ते नक्की ठरलें आहे. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. . त्याच्या प्रिअंबलमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वांवर हा पक्ष आधारलेला राहील असे स्पष्ट केले आहे. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निकषांवर पाहिली जाईल.
प्रश्न : पण पक्षाचे तत्त्वज्ञान कोणते राहील ?
` उत्तर : पक्षासाठी मुख्य गरज असते ती कणखर नेत्याची.
प्रश्न : या पक्षाचे स्वरूप व्यापक राहील कायं ?
. उत्तर: हो! या पक्षात सर्वाना प्रवेश दिला जाईल. “१
याबरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय ठामपणे घेतला होता आणि त्या दृष्टीने त्यांनी आवश्यक बाबींची पूर्तताही केली होती. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते त्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा जाहीरपणे करू शकले नाही, त्याला त्यांचा नाईलाज होता.
या पक्षाचे वैशिष्ट्य दर्शविताना ‘India votes’ या ग्रंथाचे संपादक- R. Charididas, Ward Morehouse, Leon clark, Richard Fontera म्हणतात,
“ Republican Party of India is an All-India Political Party founded by Late Dr. Babasaheb Ambedkar who was the great political thinker, the great social revolutionary and the great constitutional
Se ०.
*: प्रबुद्ध भारत, आबेडकर बौद्ध विशेषांक, २७ आक्टोबर १९५६, पृ. २५-२६.