रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४४३
हिंदी राष्ट्रसभा (काँग्रेस) सूरवातीला कांही काळ वसाहतीचे स्वराज्य मान्य करीत होती. पण तो काळ अगदींच अल्प होता.
१९३० सालीं अगदींच नाट्यपूर्ण व अनपेक्षितपणे तिनें संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला. हें स्वातंत्र्य १९४७ सालीं मिळालें.
येथपर्यंत काँग्रेसचे स्वरूप हे संसदीय लोकशाही (Parliamentary Democracy ) यशस्वी करण्यासाठीं उभारलेल्या सैन्यासारखें नसून परकीय सत्तेच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठीं एकत्रित केलेल्या पलटणीसारखें होतें. ह्याची कल्पना असल्यामुळेच, काँग्रेस ही संस्था बरखास्त करण्याची आणि स्वराज्यांतील सरकार चालविण्यासाठी पक्षपद्धतींने बांधलेले नवीन पक्ष उभारण्याची अत्यंत सूज्ञ सूचना श्री. गांधी यांनीं केलीं होती. परंतु काँग्रेस पक्षांतील पुढारी तर सरकारी कामकाजाची सूत्रे हातीं घेण्यासाठीं आपापल्या तंबूंत सर्व शस्त्रास्त्रासह सजून बसले होते ! श्री. गांधींचा सल्ला त्यांनीं जुमानला नाहीं. सर्वसाधारणपणे अशी राजनैतिक परंपरा आहे कीं, शांततेच्या प्रस्थापनेनंतर युद्ध काळांत उभारलेले सैन्य बरखास्त करावें लागतें. याचे कारणहि उघड आहे. लढाईच्या काळांत सैन्य भरती करताना योग्य तीं पथ्ये पाळलेलीं नसतात. चांगलें, वाईट, बेफिकीर, संधिसाधू अशा सर्व प्रकारच्या लोकांची भरती पलटणींत होत असल्यानें तिचा दर्जा खूएच खालावलेला असतो. भारताच्या बाबतींत हें असें सैन्य बरखास्त करण्याचें दूरच राहो, उलट त्यानें सारी सत्ता हस्तगत केली आहे.
आपणाला आतां काँग्रेस सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या कारभाराचा अनुभव मिळाला आहे. कारमार कांही भूषणावह नाहीं. असेंच कोणीहि म्हणेल.
श्री. गांधी यांच्या सल्ल्याचा विचार गंभीरपणे करण्याची आणि संसदीय लोकशाहींतील विरोधी पक्ष म्हणून काम करील असा पक्ष उभारण्याची वेळ आतां आली आहे.
[२] संसदीय आधुनिक लोकशाहीच्या Parliamentary
Democracy च्या यशस्वीतेसाठी आवश्यक गोष्टी
लोकशाही पद्धतीची शासनसंस्था यशस्वीपणे राबविता यावी म्हणून आवश्यक असलेल्या बाबी कोणत्या ?
या विषयी येथें थोडक्यांत चर्चा करण्याचें मी योजिले आहे.
. या विषयाची पार्श्वभूमी |
प्रत्यक्ष विषणची चर्चा करण्यापूर्वी तद्विषयक पार्श्वभूमीबाबत कांही प्राथमिक बाबींचा मी येथें उल्लेख करतों.