रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 486

४४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पहिली गोष्ट अशी कीं, ' लोकशाही ' चें स्वरुप सारखें बदलतें राहिलें आहे. अपण ज्या लोकशाहीबद्दल बोलतो ती कांही सातत्याने एक स्वरुपीं राहिलेली नाहीं. ग्रीक लोकांची ' अथेनियन लोकशाही ' (Athenian Demo- ८7३८५) च घ्या. ही ' अँथेनियन लोकशाही ' आणि आजची आपली लोकशाहीची कल्पना यांत महद्‌अंतर आहे. अँथेनियन लोकशाही ' मध्यें पन्नास टक्के लोक हे गुलाम असत. खरोखरी ' स्वतंत्र “ जनता फक्त पन्नास टक्केच असायची. बाकी पन्नास टक्के गुलाम असलेल्या जन विभागाला शासन संस्थेत कोणत्याहि प्रकारचें स्थान नव्हतें. ही एकच बाब ' अँथेनियन लोकशाही ' व आधुनिक लोकशाही यांतील फरक दाखवायला पुरेशी आहे. प्रथम दर्शनीच तिच्याकडे तुमचें लक्ष वेधावे असें मला वाटतें ती दुसरी गोष्ट ही कीं, कोणत्याही एका देशांत देखील लोकशाहीचे स्वरुप एकच राहिलेले नाही. इंग्लंडचे उदाहरण घ्या. १६८८ सालांत झालेल्या क्रांतीच्या पूर्वीची त्या देशातील लोकशाही व त्यानंतरची तेथील लोकशाही यांचें स्वरुप एकच आहे असें कोणीहि म्हणूं शकणार नाहीं. कोणी असेंहि म्हणूं शकणार कीं, १६८८ ते १८३२ या काळांतील इंग्लंडमधील लोकशाही व १८३२ सालीं मंजूर करण्यात आलेला ' पहिला सुधारणा कायदा ' (First Re-form Bill) अंमलांत आल्यानंतरची लोकशाही ही एकच आहे. लोकशाहीचे स्वरुप सारखें बदलत आलें आहे.

तिसरी गोष्ट अशी कीं, लोकशाहीचे नुसतें ' स्वरुप ' च (Form) बदलत आलें आहे असें नाही तर, तिचें ' उद्दिष्ट (Purpose) देखील काल ओघाबरोबर बदलत आले आहे. पुन्हां पुरातन इंग्लिश लोकशाहीचेंच उदाहरण घ्या. त्यावेळीं तेथील लोकशाहीचे ' उद्दिष्ट ' काय होतें ? राजाच्या अबाधित सत्तेवर नियंत्रण घालणें, त्याला त्याच्या विशिष्ट हक्कांच्या (Prerogative rights) अंमलबजावणीपासून परावृत्त करणें हेंच तें उद्दिष्ट होय. त्यावेळचा इंग्लंडमधील ' राजा ' ह्या थराला जाऊन म्हणत असें कीं, '' कायदे करण्याचा हक्क पार्लमेंटला असला तरी मी राजा म्हणून कायदे करू शकतो व माझ्या कायद्यांना वरिष्ठ स्थान दिलें जाईल । “ राजाच्या ह्या अशा प्रकारच्या झोटिंगशाहीमुळे (Autocracy) लोकशाही सत्यस्वरुपांत उतरू शकली नाहीं.

आज लोकशाहीचे उद्दिष्ट कोणतें आहे ? आधुनिक लोकशाहीचे उद्दिष्ट हें

अनियंत्रित राज सत्तेवर नियंत्रण घालणें हें नसून ' लोककल्याण ' साधणें हें आहे.