रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 487

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४४५

लोकशाहीच्या उद्दिष्टांत झालेला हा बदल महत्त्वपूर्ण आहे. आणि यामुळेंच

मी सदर विषयाला " आधुनिक लोकशाहीच्या यशस्वी प्रयोगासाठी आवश्यक

असलेल्या गोष्टी ' असे हेतुत:च संबोधिलें आहे.

' लोकशाही ' ची व्याख्या

' लोकशाही ' ची व्याख्या तरी काय ? पुढील चर्चा करण्यांपूर्वी ' लोकशाही '

या शब्दप्रयोगंत येणाऱ्या कल्पनेचें स्पष्ट स्वरुप आपण जाणून घेऊ

या. तुम्हाला माहीत असेल कीं, ' लोकशाही ' ची व्याख्या राज्यशास्त्रवेत्ते,

लेखक, समाजशास्त्रज्ञ आणि इतर कित्येक लोकांनी आपापल्या परीनें केलेली

आहे. अशा व्याख्यांपैकीं फक्त दोनच मी माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठीं येथे

देत आहे. वॉल्टर बेगहोट यानें इंग्लिश संविधानावर (English Constitu-

tion) एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहीला आहे, त्यांत ' लोकशाही ' चें सुस्पष्ट चित्र

रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या ग्रंथात त्यानें लोकशाहीची व्याख्या,

' चर्चेवर आधारलेली शासनसंस्था '' (Government by discussion) अशी केली आहे. अब्राहम लिंकननें केलेली व्याख्या आतां बघूं या. दक्षिणेकडील राज्यांशी झालेल्या युद्ध समाप्तीनंतर गॅटिसबर्ग येथें सुप्रसिद्ध भाषण केलें, त्यांत लोकशाहीची व्याख्या त्यानें “ लोकांचें सरकार, लोकांनीं नियुक्त केलेलें सरकार, आणि लोकांकरिताँ राबणारें सरकार ” (" A Government of the people, by the people and for the people”) अशी केली. अशा आणखी कितीतरी व्याख्याचा नामनिर्देशन करतां येईल. माझ्या पुरते बोलायचें झाल्यास मी लोकशाहीची व्याख्या निराळ्या शब्दांनी करील. मला असें वाटतें की, तीच लोकशाहीची आज खरी व्याख्या होऊं शकेल. माझी व्याख्या अशी. '' लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनांत क्रांतिकारक बदल रक्ताविरहीत मार्गांनी घडवून आणणारी शासनपद्धति म्हणजे लोकशाही होय. “ ज्या शासनपद्धतिमुळें सत्तारुढ मंडळीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत मूलभूत बदल करतां येतात आणि असें बदल ग्रहण करतांना जनता रक्तलांच्छित (हिंसात्मक) मार्गाचा अवलंब करीत नाही तेथे लोकशाही नांदते आहे. असें मी म्हणेल कीं, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. तीच उच्चतम कसोटी आहे. ज्यावेळी तुम्ही एकाद्या पदार्थाचे गुणग्रहण करतां त्यावेळी सगळ्यांत : कड़क कसोटी त्याला लावणें जरूर आहे. तेव्हांच त्याची खरी परीक्षा होते. लोकशाहीची ही व्याख्याच मी निकष म्हणून इथें वापरणार आहे.

हो अशी लोकशाही यशस्वी कशी होणार ? ह्या बद्दल प्रामुख्यानें मी लिहिणार

आहे. लोकशाहीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबी

वाय ६४१ - २”