डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४४६
मांडणी करणाऱ्या कोणत्याहि कोणत्या, याबद्दल ' लोकशाही ' या विषयाची
सांगून ठेवलेलीं नाहींत म्हणूनच लेखकानें स्पष्टपणें कांही मूलभूत अधिष्ठानें
देशाच्या परिशीलन लोकशाहींचें प्रयोग ज्या ज्या देशांत झाले त्या त्या इतिहासाचे करून लोकशाहीच्या अपयशाची कारणें शोधांदी लागतात व योग्य ती अनुमानें
आपणासच काढावी लागतात.
लोकशाहीच्या यशस्वी सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा आतां आपण
क्रमानें विचार करू.
(१) लोकशाही यशस्वी व्हावयास लागणारी प्रथम आवश्यक बाब ही कीं समाज व्यवस्थेत विषमता नसलीं पाहिजें. पीडित-दडपलेला वर्ग समाजांत असतां कामा नये. सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांच्या ठायीं झालें आहे असा वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचें काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असूं नये. अशी विषमता, अशी अन्यायकारण विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यांमध्ये हिंसात्मक क्रांतीचीं बीजें असतात आणि मग त्यांचें परिमार्जन करणें ' लोकशाही ' ला अशक्य होतें. लिकन आपल्या त्याच गॅटिसबर्ग येथील भाषणांत म्हणाला होता, '' स्वतःच्या विरुद्ध विभागलेले घर
तग धरूं शकत नाहीं '' (ahouse divided against itself cannot stand) या त्याच्या उच्चाराचा अर्थ लोकांना संपूर्णपणे आकलन झाला नाहीं. अर्थातच
अमेरिकेतील दक्षिण व उत्तर संस्थानांमधील झगड्याबद्दल तो हें बोलला. ज्यावेळीं ' विभागलेलें घर टिकू शकत नाहीं ' असें तो म्हणाला त्यावेळीं त्याला
हेंच म्हणावयाचे होतें कीं, " तुम्ही दक्षिणेकडील लोक व आम्ही उत्तरेकडील लोक जर विभागलों गेलों-एकमेकांच्या विरुद्ध उभें राहिलों-मग परकीय शत्रूंविरुद्ध आपण एकत्र उभे राहू शकणार नाहीं ' पण त्या त्यांच्या वाक्यांत यापेक्षाही आणखी खोल व महत्त्वपूर्ण अर्थ भरलेला आहे असे मला वाटते. माझ्या मतें वर्गा-वर्गातील जे महदअंतर आहे, TREY आहेत ते लोकशाहीच्या यशसिद्धीच्या मार्गावरील सर्वात मोठी अडसर बनतात हाच तो अर्थ होय. कारण उघड
आहे. लोकशाही मध्यें घडतें काय ? लोकशाहीमध्ये पीडित, दलित, ज्यांचे हक्क छिनून घेतलेले असतात असे, जे भारवाहक बनलेले असतात ते लोक आणि ज्यांनी सर्व हक्कांचा समुच्चय स्वत:पाशी केलेला असतो असे लोक या दोहोंनाही
मतदानाचा समान हक्क प्राप्त होतो. मातब्बर वर्ग (Privileged Class) हा बहुधा, पीडित वर्गपिक्षा संख्येने कमी असतो; आणि निर्णय घेण्याच्या कामी आपण
" बहुमतां' चें तत्व मान्य करीत असल्याने, जर ह्या सुरक्षित [मातब्बर] वर्गाने सुखासुखी व स्वेच्छेने आपले विशेष अधिकार सोडले नाहीं, तर मग त्यांच्या व