आणि माषणो डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ४४८
लोकशाहीमध्ये राज्यसत्तेवर लोकमताचें नित्रा" नुसतेच हवें असे नाही, तर तें
तात्काळ व सतत असावयास हवें. लोकसभेमध्ये (पार्लमेंट-कायदेमंडळ यामध्ये)
असावें लागतात. सरकारला तेथल्या तेथें अडविणारे व आव्हान देणारे लोक
या विवेचनावरून तुम्हाला दिसून येईल कीं, कोणालाहि अविरतपणे सत्ता गाजविण्याचा अधिकार नाहीं; परंतु शासनसंस्था (सरकार) ही लोकमतानुवति असावयास हवी आणि तिला अडविणारे, आव्हान देणारे लोक खुद्द सभागृहांत (कायदेमंडळात) च असलें पाहिजेत. विरोधी पक्षाचे महत्व यावरून तुम्हाला कळेल. विरोधी पक्षाच्या अस्तित्वामुळें सत्तारूढ सरकारचें ध्येयधोरण तापवून ऐरणीवर ठोकून नीटनेटके करण्याची व्यवस्था असते. सत्ताधारी पक्षाला आपल्या धोरणाचें व राज्यकारभाराचें समर्थन आणि त्या पक्षांत नसलेल्या लोकांच्या शंकांचे निरसन सततपणें करावें लागतें. दुर्दैवाने आपल्या देशांतील बहुतेक वर्तमःनपत्रें, सरकारी जाहिरातीच्या उत्पन्नासाठी म्हणा किंवा अन्य कारणासाठी म्हणा, सरकारी पक्षाला जास्त उचलून धरतात, विरोधी पक्षाला प्रसिद्धी देत नाहींत. विरोधी पक्षाकडून त्यांना काय मिळणार ? सरकारकडून त्यांना जाहिरातीचा पैसा मिळतो आणि मग काय, सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांची प्रतिवृत्तें waren रकाने भरून ही वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेलीं भाषणें अगदी त्रोटकपणें शेवटच्या पानावर, कोठेंतरी कोंपप्यांत छापली जातात. आणि म्हणूनच लोकशाही यशस्वी होण्यासाठीं विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. इंग्लंडमध्यें विरोधी
पक्षाला नुसती मान्यताच दिली जाते, एवढेंच नव्हे तर विरोधी पक्ष-नेत्याला
त्याच्या पक्षाचे कामकाज चालविता यावें म्हणून पगार दिला जातो. त्याला सेक्रेटरी (चिटणीस), टंकलेखक, कारकून असा लवाजमा पुरविला जातो
हाऊस ऑफ कॉमन्सच्या ' इमारतींतच त्याचें ऑफिस थाटून दिलें जातें. कॅनडामध्ये देखील पंतप्रधानासारखाच विरोधी नेत्याला पगार दिला जातो. कारण उघड आहे. ह्या दोन्हो देशांत सरकार चुकीच्या मार्गाने जात आहे कीं काय हें सांगणारांची आवश्यकता त्या लोकांना भासते. हैं काम अविरतपणे व सातत्याने व्हावयास पाहिजे याची त्यांना निकड भासते. आणि म्हणूनच ते विरोधीपक्षांसाठी खर्च करावयास तत्पर असतात.
(३) लोकशाहीच्या यशासाठी जरुर असलेली तिसरी बाब म्हणजे वैधानिक
व कारभार विषयक क्षेत्रांत पाळावयाची समता ही होय. ' कायद्यांतील समता [' ]
(Equality before law) या विषयाची जादा चर्चा करण्याची आवश्यकता
नाहीं. अर्थात ह्या तत्वाची अंमलबजावणी करतांना कांही ठिकाणीं अन्याय होत