रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 491

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४४९

असतातच, परंतु राज्यकारभार करताना पाळावयाची समता-दृष्टी ही चीज

आज जास्त महत्वाची बनलेली आहे. आपल्यांतील कित्येक लोकांना

राज्यकारभारांतील वशिलेबाजीची चांगलीच चुणुक अनुभवावयास वा पाहावयास मिळाली असेल. सत्तारूढ पक्षाच्या गोटांतील मंडळीला किफायतशीर होईल अशा पद्धतीनें राज्य कारभार केला गेल्याचीं कित्येक प्रकरणें तुमच्या आढळांत आली असतील. मला स्वतःला अशीं कित्येक उदाहरणें आठवतात. अमुक

एक वस्तूचा व्यापार, लायसेन्स (परवान्या) शिवाय कोणालाही करतां यायचा नाहीं

असा समजा कायदा आहे. असा कायदा तत्वतः सर्वाना सारखाच लागू असल्याने त्याबद्दल कोणीहि तक्रार करणार नाही. त्यांत'' बशिलेबाजीचा मागमूसहि नाहीं. पण त्यापुढे जाऊन आपण त्या कायद्याच्या अंमलबजावणीची छाननी करूं या. समजा सदर कायद्यान्वये लागणारे परवाने मागायला निरनिराळे लोक सरकारी अधिकाऱ्याकडे किंवा मंत्र्यांकडे जाऊ लागले आणि अशावेळी मंत्रीमहाशय जर त्या इच्छुकांच्या टोप्यांचा रंग न्याहाळून निर्णय घेऊं लागले व आपल्या पक्षाच्या छापाच्या टोपीवाल्याला लायसेन्स देऊं लागले, तर मग ती वशीलेबाजी होईल आणि कारभार विषयक समता राहणार नाहीं. अर्थात लायसेन्सचें हें प्रकरण लहानसे आहे आणि त्यांतील वशिलेबाजीचा परिणाम अगदींच थोड्या लोकांवर होतो. पण हीच वशिलेबाजी राज्यकारभारांत आणखी खोलवर घुसल्यास काय गहजब होईल ? एकाद्या पक्षांतील सभासदावर समजा कायदेशीर खटला करणें कायद्यान्वये आवश्यक झालेलें आहे, सरकारी अधिकाऱ्यांजवळ तसा भरपूर पुरावा उपलब्ध झाला आहे, अशावेळीं जर त्या विभागांतील त्या पक्षाचा पुढारी जिल्हा अधिकाऱ्याला जाऊन भेटला, तो खटला काढून टाकण्याब्इल सांगू लागला, व म्हणाला, ' हैं बघा, तुम्हीं जर आमचें एवढे काम केलें नाहीं, तर मंत्र्याला सांगून तुमची दूर बदली करायला लावील.” हें असें जर होऊं लागलें तर राज्यकारभार केवढा अन्यायकारक व गोंधळाचा होईल. कल्पनाच केलेली बरी ! अमेरिकेमध्ये ' स्पॉइल्स सिस्टिम्‌ ' (Spoils system) नांवाची एक राज्यकारभार विषयक पद्धत पूर्वी होती. नवीन पक्ष सत्तेवर आला म्हणजे तो पूर्वीच्या सरकारनें नेमलेल्या कारकून शिपायासह सर्व नोकराना कामावरून दूर करीत असे व आपल्या पुठ्यांतील आणि निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मदत कलेल्या लोकांची नेमणूक करीत असे. या पद्धतीमुळे अमेरिकेला कित्येक वर्ष चांगली कारभार यंत्रणा कधीं लाभलीच नाहीं. पुढें ही पद्धत लोकशाहीला पोषक नाहीं याची. खात्री पटल्यावर त्यांनीं ती अव्हेरली. इंग्लंडमध्यें, राज्यकारभार निष्कलंक, निःपक्षपाती व राजकारणापासून अलिप्त राहावा म्हणून तेथील लोकांनीं राजकीय व नागरिक अशी नोकऱ्यांची