रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 492

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ४५०

(कारभार विषयक) नोकऱ्या कायम स्वरुपी विभागणी केली आहे. नागरिक

सरकार आलें तरी कारभार असतात. त्यातील नोकरवर्ग कोणत्याहि पक्षाचे

हस्तक्षेप करीत नाहीं. अशा चालवितो आणि मंत्रिमंडळहि त्यांच्या कामाकाजात

लोक असतांना त्यांनीं अवलंबिली प्रकारची पद्धत आपल्या देशांत ब्रिटिश

होती. मध्यवर्ती (भारत) सरकारचा मंत्री असतांना मला जो एक अनुभव आला त्याची आठवण ताजी आहे. प्रत्येक व्हॉईसरॉयच्या नांवाचा कोणता तरी रस्ता किंवा क्लब दिल्लीमध्ये आहे. फक्त लॉर्ड लिनलिथगो यानेंच स्वतःचें नांव कोणत्याहि स्थळाला किंवा संस्थेला देवविलें नाहीं. त्यांचा खाजगी चिटणींस माझा मित्र होता. त्यावेळीं मी बाधकाम (P. W. D.) खात्याचा मंत्री होतो व माझ्या अखत्यारीत पुष्कळ कामें चाललेलीं होतीं. तो मजकडे आला आणि

म्हणाला. “ डॉक्टरसाहेब, लॉर्ड लिनलिथगोंचें नांव कोणत्या तरी संस्थेला किंवा स्थळाला देण्याबाबत तुम्हीं कांहीं करु शकणार नाहीं काय ? बाकी सर्व व्हॉइरॉयांची नांवें कोठें ना कोठें दिलेली आहेत. पण लॉर्ड लिनलिथगोंचेंच फक्त नाहीं “ मी त्याला विचार करण्याबद्दल आश्वासन: दिलें. . दिल्ली शहरांत उन्हाळ्यांत पाण्याची कमतरता भासत असल्यानें तीं दूर करण्याच्या योजनेबद्दल

मी त्यावेळीं विचार करीत होतो. माझा युरोपियन सेक्रेटरी श्री. प्रायर ह्यांस मी म्हटलें, “ हें बघ, व्हॉइसरॉयच्या सेक्रेटरींनें मजजवळ अशी सूचना केली आहे. आपण या बाबतींत कांही करूं शकणार नाहीं काय ?” आणि त्यानें काय उत्तर दिलें ? तो म्हणाला, “ साहेब, आपण अशी कोणतीहि गोष्ट करूं नये. “

सध्याच्या पंरिरिथतींत या देशांत असें उत्तर मिळणें दुरापास्त आहे. मंत्र्याच्या मताविरुद्ध बोलणें आज कोणत्याहि सेक्रेटरीला शक्य नाहीं. कारण उघड आहे. ब्रिटिश आमदानीत आपण देखील ग्रेट-ब्रिटनसारखाच नियम करून

टाकला होता कीं, कारभार विषयक कामांत, सरकारनें हस्तक्षेप करूं नये.

सरकारचें काम हैं धोरण ठरविण्याचें आहे, हस्तक्षेप किंवा पक्षपात करण्याचें नाहीं. ही बाब मूलभूत स्वरुपाची असून तिच्यापासून आपण आज दूर जात

आहोत, तिचा त्याग करीत आहोंत.

(४) लोकशाहीचे यश हस्तगत करण्यासाठीं आवश्यक असलेली चौथी गोष्ट

म्हणजे संविधानात्मक नीतींचें (Constitutional Morality) पालन होय.

पुष्कळ लोक आपल्या घटनेबद्दल (संविधानाबद्दल) अतिउत्साही दिसतात. माझे

मात्र तसें नाहीं. उलट सध्याच्या भारतीय घटनेचें उच्चाटन करूं इच्छिणाऱ्या,

कमीत कमी ती संपूर्ण दुरुस्त करण्यासाठी झटणाऱ्या मंडळीत सामील होण्यास

मी तयार आहे. . आपण एक गोष्ट मात्र लक्षांत ठेवली पाहिजे कीं, आपली आजची घटना ही कायदेशीर तरतुदीचा व तत्वांचा नुसता सांगाडा आहे. ,