रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 493

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४५१

ह्या सांगाड्याला आवश्यक असलेलें रक्‍तमांस संविधानात्मक (घटनात्मक) नीतिमत्तेच्या पालनांतच मिळेल. इंग्लंडमध्यें ह्या घटनात्मक नीतीलाच घटनात्मक संकेत (Conventions of the Constitution) म्हणतात व लोक ते संकेत स्वखुशीने पाळतात. याबाबतींत मला आठवणारे दोन प्रसंग हटकून येथे देत आहे. अमेरिकेतील १३ घटक राज्यांनीं ज्या वेळीं बंड पुकारलें त्या वेळीं अमेरिकेची सूत्रें वॉशिग्टनच्या हातीं होती. तो अमेरिकेचा ' नेता ' होता, हें विधान त्याचें त्या वेळचें अमेरिकेंतील समाज जीवनांतील स्थान परिपूर्णपणें वर्ण शकत नाहीं. अमेरिकन लोकांना तो प्रत्यक्ष देवच वाटत होता. अमेरिकेची घटना लिहून झाल्यावर वॉशिंग्टनला पहिला अध्यक्ष म्हणून निवडण्यांत आले. त्याची अध्यक्षीय मुदत संपल्यावर त्यांने दुसर्‍यांदा अध्यक्ष होण्यास नकार दिला. ही गोष्ट निःसंशय आहे कीं, वॉशिंग्टन दहा वेळां जरी सलगपणें अध्यक्षीय निवडणुकीस उभा राहिला असतां तरी त्याला कोणी प्रतिस्पर्धी बनला नसतां व लोकांनीं त्याला मोठ्या आनंदानें व एकमताने निवडून दिलें असते. पण तो मात्र दुसऱ्यांदा उभा रहाण्यासहि तयार झाला नाहीं. त्याला कारण विचारलें असतां तो उत्तरला, "' माझ्या प्रिय देशबंधूंनों, ही घटना आपण ज्या हेतूनें बनविली, त्याचा तुम्हाला विसर पडलेला दिसतो. आपल्याला वंशपरत्वें चालणारी राजेशाहीं, वंशपरंपरेने येणारा राजा किंवा हुकुमशहा नको होता म्हणूनच आपण ही घटना बनविली. इंग्लिश राजाशीं तुम्हीं या हेतूनेंच प्रेरित होऊनच संबंध तोडले आहेत. मंग माझी पूजा करून मला जर तुम्हीं वर्षानुवर्षे अध्यक्ष बनवूं लागलात तर तुमच्या तत्त्वाचे काय होईल ? इंग्लिश राजाच्या ठिकाणीं माझी स्थापना करून तुम्हीं असें म्हणूं शकाल काय कीं, इंग्लिश राजाच्या सत्तेविरुद्ध तुम्ही केलेला उठाव हा योग्य होता ? तसें तुम्हीं कोणत्या तोंडाने म्हणूं शकाल ? माझ्यावरील प्रेमामुळें व श्रद्धेमुळे तुम्हीं जरी मला दुसऱ्यांदा उभें राहाण्यांचा आग्रह करूं लागलात तरी तुमच्या या भावनाविवशतेला बळी न पडण्याचे काम, वंशपरंपरागत सत्ताशाहीचा बीमोड करण्याच्या तत्वज्ञानाचा उद्गाता म्हणून, मला कर्तव्य बुद्धीनें पार पाडावेच लागणार.” तरी परंतु लोकाग्रहास्तव त्याला दुसऱ्यांदा अध्यक्ष व्हावें लागलें. पण जेव्हां तिसऱ्यांदाहि त्याला गळ घालण्यासाठी लोक त्याच्याकडे गेले तेव्हां त्यानें त्यांना कठोरपणें झिडकारले. |

दुसरे एक उदाहरण मी देतो, आठव्या एडवर्डची कहाणी तुम्हाला माहीत असेल. गोलमेज परिषदेसाठीं मी लंडनला गेलो होतो. राजानें त्याला हव्या असलेल्यां स्त्रीशी लग्न करावें कीं नाहीं, आणि त्यांनें तसें लोकमताच्या व ठरलेल्या संकेताच्या विरूद्ध जाऊन लग्न केल्यास त्याला सिंहासनावर ठेवायचें कीं नाहीं