रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 494

डॉ. बाबासाहेद आंबेडकर लेखन आणि भाषे ४५२

माजलें होतें. राजाला लग्नाच्या या प्रश्‍नावर त्या देशांत त्यावेळीं मोठें रण

कीं नाहीं ? हाहि प्रश्‍न उपस्थित बाबतींतील हें एवढें वैयक्तिक स्वातंत्र्यहि द्यायचें

राजाच्या झाला होता. मि. बाल्डवीन (त्यावेळेचे हुजूर पक्षीय पंतप्रधान) अर्थातच ह्या लग्नादिरुद्ध होते. तो राजाला म्हणत होता, "तूं जर माझे ऐकलें नाहींस, तर तुला राजपद सोडावे लागेल.” मि. चर्चिल हे राजा एडवर्डचें मित्र होते व त्याच्या पाठीशीं उभे रहाण्यास तयार होते. लेबर पार्टी (मजूर पक्ष) विरोधी पक्ष

म्हणून त्यावेळी होता. मला पक्के आठवतें कीं हुजूर पक्षांतील ह्या प्रश्‍नावरील फाटाफूटीचा फायदा उचलून बाल्डविनचा पराजय करायचा कीं नाहीं याबद्दल मजूर पक्षांत विचार चालूं होता. कारण हुजूर पक्षांतील कित्येक सभासद राजनिष्ठेंमुळें एडवर्डची बाजू घेण्यांस तयार होते. त्यावेळीं प्रोफेसर लास्की (मजूर पक्ष) 'हेराल्ड' या नियतकालिकांत लेखामागून लेख लिहून मजूर पक्षाने तसें करूं नये म्हणून बजावीत होते, अशा हालचालींचा निषेध करीत होते. ते म्हणत होते, “ आपण घटनात्मक संकेतानें एक गोष्ट मान्य केली आहे कीं, पंतप्रधानाचा सल्ला राजा मानील; आणि त्यानें तसा तो.न मानल्यास पंतप्रधान राजाला घालवून देऊं शकेल. हा असा आपला सर्वमान्य संकेत असल्यानें, ज्यायोगें राजाचें अधिकारक्षेत्र वाढेल अशी वर्तणूक करून या प्रश्‍नावर बाल्डविनचा पराजय करणें चुकीचें ठरेल. मजूर पक्षाने हा सल्ला

मानला. संकेत खिलाडू वृत्तीनें पाळलेच पाहिजेत असें त्यांनीं ठरविलें. इंग्लडचा इतिहास वाचताना अशीं कित्येक उदाहरणें तुम्हांला आढळतील कीं, जेथे तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकांस, मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधीपक्ष म्हणून काम करीत असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची (घटनेची) व लोकशाहीची हानी होऊं नये

म्हणून कटाक्षानें टाळले आहेत. |

(५) लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून आणखी एका गोष्टीची

आवश्यकता आहे असें मला वाटते, ती म्हणजे लोकशाहीच्या नांवाखाली

अल्पसंख्याकांची (अल्पमतवाल्यांची) गळचेपी बहुमतवाल्यांकडून होता कामा

नये. अल्पसंख्यकांना सुरक्षितता वाटली पाहिजे. बहुसंख्यांक मंडळी

कारभार करीत असली तरी आपल्याला इजा पोहोचणार नाहीं, आपल्यावर अन्याय होणार नाही याची हमी अल्पसंख्यांकांना मिळाली पाहिजे. इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभे) मध्यें हया तत्वाचा मान फार राखला जातो. १९३१

सालच्या इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकानंतर मजूर पक्षाचे नेते श्री. LAS

मॅकडोनाल्ड यांच्या नेतृत्वाखालीं राष्ट्रीय मंत्रिमंडळ तयार करण्यांत आले. त्यानंतर

निवडणुका आल्या त्यावेळीं मजूर पक्षाची सभासद सख्या १५० वरून ५० वर