रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 496

४५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

संबोधण्यात येले. असें सरकार म्हणजे तरी काय ? स्वतंत्र सरकार म्हणजे ती राज्यपद्धति कीं, जिच्यामध्ये जास्तीत जास्त सामाजिक क्षेत्रांत लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय मोकळेपणानें जीवन जगतां येतें, आणि जर कायदा करण्याची अवश्यकता वाटलीच तर तसला कायदा पाळला जाण्याइतपत सामाजिक नीति समाजामध्ये निर्माण झाली असल्याची खात्री कायदे करणारांना मिळाली पाहिजे. लोकशाहीच्या या अंगाबद्दल फक्त प्रोफेसर ' लास्की' यांनींच उल्लेख HoT आहे. त्यांच्या एका ग्रंथांत ते असें ठामपणें म्हणतात कीं, लोकशाही राज्यपद्धतीमध्ये समिष्टींतील नीतिमान जीवन गृहित धरलेले असतें. सामाजिक नीतीच्या अभावी लोकशाही यशस्वी होऊं शकत नाही, ती छिन्नविछिन्न होईल. आपल्या देशांत हा अनुभव आपल्याला मिळतो आहे.

(७) लोकशाहीच्या प्रस्थापनेंसाठी आवश्यक असलेली आणखी एक बाब म्हणजे विचारी (विवेकी) लोकमत (Public Conscience) होय. प्रत्येक देशांत अन्याय होत असतात याबद्दल शंका नाहीं; तरी परंतु तो सर्वत्र सारख्याच प्रमाणांत आहे असें मात्र नाहीं.

` समाजांतील कांही लोकांना अन्यायाची अगदींच थोडी झळ Ted; तर काहींना अनन्वित छळ सोसावा लागतो, ते अन्यायाच्या ओझ्याखालीं दडपून गेलेले असतात.

या संदर्भात इंग्लंडमधील ज्यू लोकांचें उदाहरण देतां येईल. तेथील खिश्चन लोकांनीं कधीं अनुभवला नाहीं असा एक आगळाच अन्याय त्याना भौगावा लागला, त्यामुळे ज्यू लोकांना या अन्यायाच्या विरूद्ध एकाकी लढा द्यावा लागला. इंग्लिश खिश्चन लोकांनी त्यांना कधीं मदत केली नाहीं. उलट ज्यूवर होणाऱ्या अन्यांयांत त्यांना आनंद वाटायचा. ज्यूंना मदत करणारी इंग्लंडमधील एकुलति एक व्यक्ति म्हणजे तेथील राजा. याचे कांहींना आश्चर्य वाटेल. पण त्याचे कारणही तसेच गमतीचे आहे. जुन्या खिश्चन कायद्याप्रमाणे ज्यू लोकांच्या वंशजांना ते ज्यू आहेत या कारणासाठीं म्हणून वाडवडिलांची प्राप्ति (इस्टेट) मिळत नसे. ती राजाची दौलत म्हणून सरकार जमा होत असें. यामुळें राजाला साहजिकपणेंच आनंद व्हायचा.- मृत ज्यूंची मुलें ज्यावेळीं राजाकडे अशा इस्टेटीरगठी अर्ज करायची, त्यावेळी राजा उदार होऊन त्यांना थोडासा हिस्सा देऊन बाकी सर्व स्वत:कडे ठेऊन घ्यायचा. अशा प्रकारचा अन्याय ज्यू लोकांवर होत असतांना देखील एकहि इंग्लिश माणुस, त्यांच्या मदतीला धावला नाही. हा सार्वजनिक विवेक बुद्धी (Public Conscience) जागृत नसल्याचा परिणाम होता. अन्याय कोणावरहि होत असो, अन्याय दिसला रे दिसला कीं,