रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४५५
जागृत होऊन उठणारी शक्ति प्हणजे समिष्टीची सद्सदविवेक बुद्धी, सार्वजनिक विवेक बुद्धी याचा अर्थच असा कीं, जिच्या प्रादुर्भावामुळे समाजातील प्रत्येक माणूस, मग तो त्या अन्यायाचा बळी असो वां नसौ, अन्यायाचे परिमार्जनार्थ पीडितांना साथ द्यायला उभा राहतो. अगदीं अलिकडचे उदाहरण aad झाल्यास दक्षिण आफ्रिकेकडे बोट दाखविता येईल. तेथें अन्यायाचे बळी पडणारे लोक हिंदी आहेत. तेथील गोऱ्या लोकांना त्यांची कांही झळ पोहचत नाहीं. असें असतांनाहि मि. स्कूट हा गोरा इसम सदर अन्यायाचें परिमार्जन करण्यासाठीं जिवाचें रान करीत असल्याचें आपण पाहातो. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या चळवळींत कित्येक गौरवर्णीय, तरूण तरुणी सामील होत आहेत. हें दृश्य कां दिसतें ? तें जनतेंतील सारासार विवेकबुद्धीचे फळ आहे. मला तुम्हांला डिवचायचे नाहीं; परंतु मला पुष्कळ वेळा आपल्या विसराळूपणाचे नवल वाटतें. दक्षिण आफ्रिकेतील अन्यायाबद्दल आपण मोठ्या आवेशानें बोलतो. आफ्रिकेतील विभक्त (अलग) लोकवस्ती (Segregation) च्या धोरणा विरुद्ध बोलणारे
आपण आपल्या देशांत जर दृष्टी टाकूं लागलों, तर प्रत्येक गावांत हें विभक्त
वस्तीचे तत्वज्ञान कार्यवाही झालेलें आपणास दिसणार नाही काय ? आपल्या प्रत्येक खेड्यांत ' दक्षिण आफ्रिका ' अवतरली आहे. असें असलें तरीं, विभक्त वस्तीत ठेवलेल्या अस्पृश्य (दलित) जातींचा प्रश्न हाताळण्यासाठी व त्यांच्यावरील अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी क्वचितच कोणीं पुढें आल्याचें दिसतें. हें असें कां होते ? कारण उघड आहे. सामाजिक विवेकं बुद्धीचा अभाव | असा प्रकार जर होऊं लागला आणि अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठीं जर इतर लोक पुढे आले नाहीत तर मग पुन्हां क्रातीचें वारे अल्पसंख्यकांच्या डोक्यांत खेळूं लागते.
वरील विवेचन म्हणजे निरनिराळ्या राजकीय तत्वांची ठोकळेबाज जंत्री नव्हें परंतु निरनिराळ्या देशांचा राजकीय इतिहास वाचल्यामुळे [माझ्या ] [मनावर ] बिंबलेल्या गोष्टींची ती अनुभूति आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटिश चालते झाले आहेत, लोकशाहीचा पुकारा करणारी राज्यघटना आपण केली आहे, तेव्हां आपल्याला या बाबतींत आणखी काय हवें आहे ? आपण आतां निश्चित बसूं या, असल्या प्रकारची भावना या देशांतील लोकांत बळावत आहे. राज्यघटना तयार केली म्हणजे आपले काम संपले ह्या प्रकारच्या आत्मघातकी भावनेच्याबाबत मी सर्वांना धोक्याचा इषारा देऊं इच्छितो. आपलें कामं आताशी कुठे YS झाले आहे. आपण