vug डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ध्यानात ठेवले पहिजे कीं, लोकशाहीचा वृक्ष सर्वच ठिकाणी नीटपणें फोफावूं शकतो असें नाही, तो अमेरिकेत वाढला आहे, इंग्लंडमध्यें त्याची वाढ झाली, कांही अंशानें त्यानें फ्रान्समध्येंहि मूळ धरलें आहे. इतरत्र घडलेल्या ह्या आशादायक घछटनांपासूनच आपणास धीर येईल.
तुम्हाला आठवल असेल की, पहिल्या महायुद्धाचा परिणाम म्हणून आणि ऑस्ट्रिया-हंरोरीच्या साम्राज्याचे विघटन केल्यामुळें, स्वयंनिर्णयाच्या (Self determination’ तत्त्वानुसार आस्ट्रियाहून अलग अशी छोटी छोटी राष्ट्रे विल्सनने निर्माण केली, त्यांना लोकशाही घटना, लोकशाही सरकार आणि व्हरोल्स येथील तहनाम्याप्रमाणें मूलभूत हक्कांची व्यवस्था करणारी राज्यघटना होती. त्या लोकशाहीचे काय झालें ? तिचा लवलेश तरी तुम्हांला तेथें दिसतो काय ? ती आता संपूर्ण लुप्त पावली आहे, नष्ट झाली आहे. ही सर्व राष्ट्रे अज दुसऱ्या कुणाच्या तरी गुलामगिरीत किंवा मगरमिठींत सापडलेली आहेत.
अलिकडची कांही उदाहरणें घेऊ या. सिरियामध्यें लोकशाहीनिष्ठ सरकार होते. कांही वर्षानंतर तेथें एक लष्करी बंड झालें, लष्कराचा सरसेनापति सीरियाचा राजप्रमुख बनला व लोकशाही हवेंत विरली. दुसरें उदाहरण घेऊं या. इजिप्त मध्यें काय घडलें ? तेथें देखील लोकशाही राज्यपद्धति १९२२ सालापासून सतत तीस वर्षे अंमलांत होती. एकारात्रींत फरुकची हकालपट्टी झाली, नारिड हुकुमशहा बनला. त्याने घटना बरखास्त केली.
हीं सर्व उदाहरणें आपल्यासमोर असल्यानें आपण आपल्या भविष्याबद्दल अत्यंत जागरूक व विचारी बनलें पाहिजे. लोकशाही सुरक्षित करण्यासाठीं तिच्या मागतील दगड धोंडे दूर करण्याकरतां आपण कांहीं निश्चित पावलें उचलायची कीं नाहीं याचा आपण विचार करावयास हवा.
मी केलेल्या या सर्व विवेचनामुळें, तुम्हीं सर्वजण ह्या प्रश्नांबाबत डोळेझाक करणार नाही, एवढे झालें तरी मला समाधान लाभेल.
[३] संसदीय राज्यपद्धतीत विरोधीपक्षाची आवश्यकता कां असते ?
सृजनशील लोकमताच्या अभावामुळे लोकशाहीं राबविण्यांत अडचणी येतात. सरकार व कायदेमंडळाचे कामकाज योग्य रीतीनें होण्यासाठीं लोकमत
ओळखता आलें पाहिजें. :
हां मुद्दा स्पष्ट करण्यासाठीं शिक्षण व चार यांतील फरक सांगणें जरूर आहे प्रचार'डिष्ठित सरकार व लोकारिक्षणाचा पाया करणारे सरकार यात