८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
केला. पण -विरोध म्हणजे कृतिशून्य वावदूकपणा ही जशी त्यांची व्याख्या नव्हती तसेंच सहकार्य करायचें म्हणजे सरकारच्या भूकुटीभंगाचे दास झाले पाहिजे असेंही त्यांना वाटत नव्हतें. राजेसाहेब मृत्युवश झाले असले तरी त्यांचे हे गुण अनेकांना मार्गदर्शक होण्यासारखे आहेत.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ जानेवारी १९२९.