परिशिष्ट-२
कोंकण प्रांतिक पूर्वास्पृश्य शिक्षण परिषद , मालवण
कोंकण प्रांतातील सर्व पूर्वास्पृश्यांची परिषद उन्हाळ्याच्या सुटींत सुप्रसिद्ध पुढारी डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. तरी सर्व पूर्वास्पृश्य बंधु भगिनींनी स्वागत मंडळाचे सभासद घेवून परिषद यशस्वी करण्याचे कामीं मदत करावी अशी त्यांना नम्र विनंती आहे.
स्वागत मंडळ
अध्यक्ष :--डॉ. राजाराम केशवराव गवंडे, मालवण. |
उपाध्यक्ष :--श्री. गंगाधर कृष्णाजी राऊळ, नामदेव दास वेरलकर, वेरली ता. मालवण, सावळा गेनूजी येडगावकर (कलल हवालदार,) मुकुंद धाकू चव्हाण लो. बो. मेंबर ता. मालवण, भागुजी गंगाराम पोइपकर मु. पोइप.
ऑ. सेक्रेटरी :--लक्ष्मण सगुण चव्हाण.
अ. सेक्रेटरीज :--श्री. भिवा सोमा. जाधव, कणकवली ता. देवगड, गोविंद येसू मालवणकर नांदगाव ता. देवगड, शंकर लक्ष्मण भिलवडकर पुरळ ता. देवगड, कृष्णा धाकू चव्हाण परुळे पेठा वेंगुर्ले.
खजिनदार :--कृष्णा बाबाजी चव्हाण.
अ. खजिनदार :--खापरनाईक बाबू जाधव, कांदळगांव ता. मालवण.
ता. क.-सर्व पत्र व्यवहार सेक्रेटरीच्या नांवें करावा,
परिषदेची नककी तारीख मागाहून कळविण्यांत येईल.
$
बहिष्कृत भारत, ता. ४ जानेवारी १९२९.