परिशिष्टे - Page 513

परिशिष्ट-३
अखिल हिंदुस्थानांतील अस्पृश्य व त्यांचे पुढारी
डॉ. आंबेडकर यांस, खिस्त जयंतीचा संदेश

(श्री. प्रभाकर ना. उबाळे यांजकडून)

बंधुजनहो, आज आपल्या समाजाची होत असलेली दुर्दशा पाहून आमच्या अंतःकरणाला अतिशय खेद होत आहे, व त्यामुळेच खिस्त जयन्तीचा हा संदेश आपल्याकडे पाठवीत आहो. या संदेशाच्या योगें आमचें आध्यात्मिक कल्याण झालें आहे असें आम्हांस खात्रीपूर्वक वाटतें, व तसेंच तें तुमचेंही होईल यांत आम्हांला मुळीच शंका वाटत नाहीं. निर्विकार मनानें, खुल्या अंतःकरणानें व दुराग्रह सोडून, व तुमच्या सर्व समाजाची हलाखीची परिस्थिती लक्षांत आणून तुम्हीं या संदेशाचा विचार कराल अशी आशा आहे.

धर्म हा तुमचा आवडता विषय असल्यामुळे त्याजकडे तुमची ओढ असणें साहजिक आहे. आणि तशी ती आहे म्हणूनच आज हिंदृधर्मीय लोकांपाशीं धार्मिक व सामाजिक हक्कांची मागणी तुम्हीं करीत आहां. पण तुम्ही त्यांच्याकडे जे हक्क मागत आहां ते तुम्हाला देण्यास त्यांची तयारी नाहीं. याचें कारण

- तुम्ही धर्माने हिंदु नाहींत. तुम्ही हिंदु असतां तर त्यांनीं केव्हाच तुम्हाला आपलेसे करून तुम्हीं मागत असलेले हक्कही दिले असते. असें असल्यामुळें तुम्हीं हिंदु लोकांकडे जी मागणी करीत आहां ती सर्वथैव चुकीची व व्यर्थ आहे. म्हणून निष्कारण हिंदू लोकांचे चरण धरून तुम्हीं आपल्या माणुसकीला कमीपणा आणूं नका. परंतु ज्या खिस्ती इंग्रजांच्या राज्यांत तुमच्या सामाजिक सुधारणेकडे व उन्नतीकडे लक्ष देण्यांत येऊन तसे प्रयत्नही करण्यांत येत आहेत, त्या लोकांच्या घर्मासंबंधी विचार करा. खिस्ती इंग्रजांचे हिंदुस्तानवर राज्य नसतें तर आज डॉ. आंबेडकरांसारख्या विद्वानालाही, केवळ ते अस्पृश्य म्हणून, जगापुढे येणें अशक्य झालें असतें, हें समस्त अस्पृश्यांना कबूल होईलच, पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, आमचे अस्पृश्य बंधू, ज्या धर्माचे लोक त्यांना जवळ घेऊ इच्छितात त्यांच्यापासून दोन हात दूर राहूं चाहतात, व जे लोक त्यांना कुत्र्यामांजरापेक्षांही नीच समजून दूर ठेवतात, त्यांच्या मागें जाण्याची इच्छा करतात. या त्यांच्या अज्ञानाबद्दल व स्वाभिमानशून्यतेबद्दल कोणालाहि Tet कींवच येईल.