परिशिष्टे - Page 514

४७२ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

पापमुक्तीविषर्यी विचार

धर्माविषयी बोलूं लागल्यावर ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीबद्दल विचार करावयाचा ती गोष्ट म्हणजे आपल्याला पापमुक्ती किंवा मोक्ष कसा प्राप्त होईल ही होय. हा विचार करण्याच्या पूर्वी मनुष्याला आपल्या पातकाची जाणीव झाली पाहिजे तशी ती झाली म्हणजे साहजिकपणेंचं तो त्या पातकापासून मुक्त होण्याचा विचार करील. आणि असा विचार करीत असतां कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचें ते एका कवीने खालील कवितेंत सांगितलें आहे :--

तारण म्हणजे काय? कशाला?

होईल सत्य कशानें हो?

त्राता कैसा? कोण असावा?

हेंच विचारें पाहा हो

: गद्यभाषेंत सांगावयाचे म्हणजे, तारण अर्थात पापमुक्ती म्हणजे काय, ती कोणाकडून मिळेल, मुक्तीदाता कसा असावा या मुद्यांचा विचार केला पाहिजे. पण अस्पृश्य समाज परंपरेला बांधलेला असल्यामुळें तो आत्मोन्नतीचा विचार करीत नाही. जोपर्यंत अस्पृश्यबांधवांस जगापुढें येण्याची लालसा जागृत होत नाही जोपर्यंत त्यांचा मेलेला अभिमान जागा होत नाही, तोपर्यंत त्यांच्यांत विचारक्रांती घडून येणें अशक्य आहे. म्हणून त्यांना आमचा असा संदेश आहे कीं उठा जागे व्हा, आणि पाप मुक्तिचा व सामाजिक व धार्मिक उन्नतीचा या ख्रिस्त जयंतीच्या मंगल समयीं विचार करा

पापमुक्तीचे साधन

य़ा जगांत कोणतीही. वस्तु साधनाशिवाय प्राप्त होत नाही. पापमुत्तीलाही हाच नियम लागू आहे. ज्या ज्या लोकांना पापमुक्त होण्याची उत्कंठा लागली त्यांनी त्यांनी विविध साधनांचा उपयोग क्रेला आहे, व करीत आहेत. फत्तराची मूर्ती बनवून तिची पूजा करणें, तिला पंचपक्वानांचे नैवैद्य दाखविणे, तिच्यापुढे बकऱ्या कोंबड्यांचे. बळी देणें, गुरू करून घेऊन त्याची सेवा करणें वगैरे नानाविध साधनांचा उपयोग करून लोक पापमुक्ती मिळविण्याचा प्रयत्न. करीत असतात. पण या मुत्तीसाधकांनी हेतुसिद्धिसाठीं हातांत जीं साधनें धरलीं आहेत, त्यांनीं त्यांचे साध्य साधलें जाईल किंवा नाही याचा व्रिचार केला पाहिजे. भाव तेथें देव या भाबड्या व मोघम समजुतीत कांहीं अर्थ नाही. मुर्ति या साधनाविषयीं विचार केला असतां, तो मनुष्यानें विशिष्ट आकार दिलेला एक निर्जीव फत्तर आहे हें सांगावयास नकोच. त्याच्यांत देवपण नाहीं. डोळे