परिशिष्टे - Page 515

परिशिष्टे ४७३

मिटून मूर्तिपुढें बसल्यानें डोळ्यापुढे ती फत्तराची मूर्तिच येईल; ईश्वराचें स्वरूप लक्षांत येणें शक्य नाहीं. अर्थात पापमुक्ति मिळणें दूरच राहिलें. तीर्थाच्या ठिकाणीं केलेल्या स्नानाचीही हीच गत आहे. स्नान केल्यानें भ्रष्ट झालेले अंतःकरण स्वच्छ होणार नाहीं. बकऱ्या-कोंबड्यांच्या बलिदानाविषयीं विचार केला असतां, त्या बिचाऱ्या प्राण्यांना ठार मारून पापांची क्षमा कशी काय मिळेल तें समजत नाहीं. पापमुक्तीसाठी संतांचें व तत्वज्ञान्यांचें शिष्यत्व पत्करण्यांतही सुज्ञपणा नाहीं. कारण, त्यांनीं गूढ व गहन धर्मतत्वांचा खल केलेला असला तरी आमच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणारांना आम्हीं पापमुक्ती देऊं असें त्यांनी सांगून ठेवलें नाहीं. थोडक्यांत सांगायचें म्हणजे, पापमुक्तीसाठीं लोक ज्या साधनांचा अवलंब करतात, तीं कोणत्या ना कोणत्या प्रकारांने लटकीं ठरत आहेत. साधन असें पाहिजे कीं त्याकडून मुक्तीचे वचन मिळेल.

एकेश्वरी मताकडे झुकूं नका

शुद्धाद्वैवादी किंवा एकेश्वरी नांवाचा एक पंथ आहे. त्याचें म्हणणें असें आहे की पापमुत्ती व देवप्राप्ती होण्यास साधनाची जरूरी नाहीं; देव दयाळू व प्रेमाळू आहे, त्याच्यासमोर आपल्या पातकांचा पश्चाताप केला कीं तो पालकाची क्षमा करतो. व पातक्याच्या अंतःकरणाला समाधान देतो. पण त्यांचें हें म्हणणें व्यवहाराला मुळींच धरून नसल्यामुळे तें अंतःकरणाला पटत नाहीं. कोणताही व्यवहार जर साधनाशिवाय होत नाही, तर देवप्राप्ति व पापमुक्ती तरी साधनाशिवाय कशी काय साध्य आहे? या साधनाला कोणी मध्यस्थ किंवा प्रतिनिधि म्हणतात, व या साघनांपैकी काहींचे विवेचन पूर्वी आलें आहे. मध्यस्थाचें अगर प्रतिनिधीचे हें तत्व सर्व धर्मांनी एकमुखानें मान्य केलें आहे ! एवढेच नाहीं तर कांहीं शुद्धाद्वैतवाद्यांनाहीं तें शेवटीं कबूल करावें लागलें आहे. सर फ्रान्सिस न्युपोर्ट नांवाचा एक प्रख्यात शुद्धाद्वैतवादी होऊन गेला. तो अंथरुणावर पडून असतां म्हणाला, “मी देवाच्या क्रोधाचा परिणाम रात्रंदिवस भोगीत आहें . . . . मला लहानपणी खिस्ती धमचिं शिक्षण इतरांपेक्षां अधिक मिळालें असतांही मी दयेच्या आत्म्याचा (पवित्र आत्म्याचा) धिःकार केला हेंच याचें कारण असावें...” या कट्ट्या -शुद्धाद्वैतवाद्यानें मध्यस्थाच्या तत्वाला न जुमानतां आपल्या पातकांबद्दल पराकाष्टेचा पश्चाताप इश्वरासमोर केला होता: मग त्याच्या पातकांची क्षमा होऊन त्याच्या अंतःकरणाला समाधान कां मिळालें नाहीं ? त्याच्या आत्म्याची अपरिमित तळमळ कां झाली ? याचें कारण हेंच कीं मध्यस्थाशिवाय आपण जें केलें तें व्यर्थ अशीं त्याची खात्री पटली होती. एकेश्वरी मत अग्राह्य आहे हें यावरून ध्यानांत येण्यासारखें आहे.