डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४७४
येशू Raa ईश्वर व मानव यांच्यामधील मध्यरथ
लोक जीं विविध साधनें हातीं पापमुक्ती व देवप्राप्ति मिळविण्यासाठी विविध
आहे. असें घेतात, त्यांनी त्यांचे इच्छित साध्य होणें शक्य नाहीं हें पूर्वी दाखविलेंच आहे म्हणूनच लोकांना ईश्वरप्राप्ती करून द्यावयाला व त्यांच्या पातकांची क्षमा करायला म्हणजेच त्यांना पापमुक्ती द्यायला, येशू खिस्त देह धारण करून या पातकी जगतांत आला. येतांना तो म्हणाला “ होम व अर्पणें यांची तुला इच्छा नाहीं. त्यांनी तुला संतोष झाला नाही. . . तुझी इच्छा पूर्ण करावयास मी आलों आहे.” याच समयीं स्वर्गातील दूत हर्षाने म्हणूं लागले “ उर्ध्वलोकीं देवाला गौरव व पृथ्वीवर मनुष्यांना शांति मिळाली आहे. त्यांजवर त्याचा प्रसाद झाला आहे.” खुद्द येशू खिस्त म्हणतो “ प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे. दीनांस सुवार्ता सांगावयास परमेश्वरानें मला अभिषेक केला आहे. पाडाव केलेल्यांस मुक्तता द्यावी, बंदीवानांस बंधमुक्त करावें व शोकग्रस्तांस समाधान द्यावें म्हणून त्यानें मला पाठविलें आहे.” आणि परमेश्वर येशु खिस्तांविषयी म्हणतो, “तू युगानुयुग (मी व मानव यांच्यामध्यें) मध्यस्थ आहेस.” येशूचा एक शिष्य म्हणतो “ पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा, ” दुसरा शिष्य म्हणतो “ असाच मध्यस्थ आम्हांस योग्य होता”, या पुराव्यावरून हेंच ठरतें कीं येशू हा देव व मानव यांच्या मधला मध्यस्थ असून मानवाला पापमुक्ती व ईश्वरप्राप्ति करून देण्यासाठीं खुद्द परमेश्वराने त्याची
योजना केलेली आहे.
अस्पृश्य बांधवांनी येशूचे शिष्यत्व कां पत्करावे ?
(१) तो मानवप्राणी व ईश्वर यांमधला मध्यस्थ आहे.
(२) त्यानें दिलेलें शिक्षण अत्यंत उदात्त आहे. आणि विशेष हें कीं तो लोकांस जें शिकवी त्याप्रमाणेंच तो स्वतः वागे. “बोले तैसा चाले ” हैं त्याच्या
चारित्र्याचे वैशिष्ट्य आहे.
(३) त्यानें सर्व मानवप्राण्यांस समसमान मानलेले असून सर्वांना एकमेकांवर प्रेम करण्यांस बजाविलें आहे. हा एकच मुद्दा सर्व पापी मानवांना अत्यंत
फायद्याचा व मोलाचा आहे; व अस्पृश्य समाजानेंच नव्हे तर सर्व जगाने येशूचे
शिष्यत्व कां पत्करावे हें दाखविणारा आहे.
(४) त्यानें सर्व जगाला राजरोसपणे जाहीर केलें आहे कीं मानवप्राण्यांचा
मुक्तीदाता मी आहे. तो म्हणतो मी पाप्यांस बोलाविण्यास आलों आहे. अहो