परिशिष्टे - Page 517

परिशिष्टे ४७५

कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे “मी तुम्हाला विश्रांति देईन. मला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” पुढें तो आणखी म्हणतो “मी स्वर्गाचें दार आहे. मजकडे आल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यांत जाणार नाहीं. ”

अशाप्रकारे येशू ख्रिस्त हा पापमुक्ति व ईश्वरप्राप्ति करून देणारा आहे. अस्पृश्यबंधूनों, तुम्हीं पापमुक्ति करतां व ईश्वरप्राप्तिकरतां जीं साधनें हातीं धरलीं आहेत, तीं जर पापमुक्तियें वचन देत नसतील व ईश्वराचीही

ओळख करून देत नसतील तर त्यांच्या मागें अंधश्रद्धेने जाऊन आपल्या आत्म्याचा

नाश करून घेऊं नका. यापेक्षां “पापांची क्षमा करण्याचा मला अधिकार आहे ” असें आश्वासन देणाऱ्या येशूकडे समजून उमजून या व त्याचें शिष्यत्व पत्करा. जर दुसरा कोणी अवतार खिस्तासारखेच आश्वासन देत असेल, तर प्रथम त्याचे आचरण पहा व त्याचे आश्वासन कोणाकरतां आहे याचा चांगला विचार करा. पण आमची खात्री आहे कीं येशूखिस्तासारखे आश्वासन कोणीहि दिलेले नाही. म्हणून येशू खिस्तजयंती निमित्त हा जो संदेश तुम्हाकडे पाठविला आहे त्याचा नीट विचार करा, अशी विनंति आहे. |

बहिष्कृत भारत, ता. १८ जानेवारी १९२९.