परिशिष्टे ४७७
सुपरवायझर खेरीज अस्पृश्य समाजांत मिसळून त्यांची मनें शिक्षणाकडे वळविण्याचे काम कोणताही स्पृश्य सुपरवायझर करणार नाहीं हें डि. बोर्ड जाणत आहेच. करितां वरपांगी सहानुभूति न दाखवितां अस्पृश्यांच्या सुधारणेचे प्रयत्न कृतीत बोर्ड दाखवील अशी आशा आहे.
(१) रंभाजी राघुजी बगारे
राहणार गाजूबाई (बारामती)
जि. पुणें.
(२) शंकर दगडू धेंडे
राहणार बेलसर, जि. पुणें,
बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९.
बाय ६४१ - ३३