परिशिष्टे - Page 520

परिशिष्ट-५

|| सत्यमेव जयते ||

हिंदु समाजास जाहीर विनंती

आम्ही ५००० लोक हिंदू धर्म सोडणार ?

सध्या हिंदू धर्मात जो जातीभेद रुढ आहे, त्यामुळें हिंदु धर्माचे पाठबळ विभागले गेले आहे

गेल्या हजारौं वर्षापासून हिंदु धर्मांत राहिल्याने महार मांग इत्यादि आम्हां अस्पृश्यांचा हरघडी असह्य अपमान होत आहे. हिंदुच्या देवळांत मूर्ति भंजक व गोभक्षक परधर्मी मुसलमान अथवा खिस्ती लोक जाऊं शकतात, परंतु हिंदु देवतांना पूज्य मानणाऱ्या आम्हां गोभक्त अस्पृश्यांना हिंदु लोक त्यांच देवळाची पायरी देखील as देत नाहींत.

खरें पाहतां ज्या हिंदु धर्मांत आम्ही आहोंत त्याच धर्मांचे लोक आमचा द्वेष करीत असून तेच आमचे खरेखुरे शत्रू आहेत. जळगांव येथील महार हा सहा महिन्यापूर्वी बाटून मुसलमान झाला, तो पूर्वीचा पिराजी व आतां शेख पिरन म्हणवून कसाबाचा धंदा करतो. व रोज टोपलींत गाईचे मांस घेऊन रस्तोरस्ती सर्व हिंदु समोर विक्री करीत फिरतो. तोच शेख पिरन हिंदु लोकांचे विहिरीवर राजरोस पाणी भरतो. पण हिंदु लोक त्याला मनाई करीत नाहींत. आणि आम्हां महार मांगापैकी शेकडों लोक “ मानभव * व ' वैष्णव ' पंथाचे असून ते गाईचेच काय पण कसलेही मांस खात नाहींत. तरी पण त्यास हिंदु लोक स्पर्श करण्यांस राजी नाहींत, आमचा स्पर्श झाल्यानें हिंदु धर्म व हिंदूचे देव बाटतात. तर असला 'बाटगा धर्म? व “बाटगे देव ' आम्ही आमचे मानणें यांत आम्हांस शरम पैदा होते. ज्या हिंदु धर्मांत आम्ही आहों त्या धर्माने आमच्याकरितां इतके दिवसांत काय केलें आहे? असा आमचा हिंदु धर्माच्या पुढाऱ्यांना जाहीर सवाल आहे.

अशा उच्च धर्मांत महार मांगांनीच काय पण इतरांनी देखील राहूं नये, अशी आमची सर्व लोकांस सूचना आहे. या नोटिशीनें सर्व हिंदु लोकांस आम्हीं जाहीर करितों कीं, ता. १ जून १९२९ च्या आंत तुम्हीं जर आमचा स्पर्शास्पर्श