परिशिष्टे ४७९
भेद नाहींसा करणार नाहीं; व आम्हांस समाजांत निदान तुम्हीं मुसलमान _ लोकांइतके सामाजिक हक्क देणार नाहीं; तर ता. २ माहे जून १९२९ रोजीं आम्ही जळगांवचे व आसपासचे खेड्याचे मिळून मुलाबाळांसह ५००० लोक मुसलमान अथवा ख्रिस्ती धर्माचा स्विकार करूं. हिंदुस्तानांतील कांहीं पुढारी अस्पृश्यांकरिता झटतात. परंतु त्यांचेवर बऱ्याच धनिकांचा रुसवा होऊन त्यांना असह्य त्रास भोगावा लागतो व त्या योगें त्यांचें मन बरेंच दुखवत असेल. हिंदु सभा, सत्यशोधक समाज, आर्यसमाज इत्यादिकांना आमच्याशी पत्रव्यवहार करणें असल्यास तो भिकु इसाजी खंडेराव, मु. पोष्ठ जळगांव (जामोद), जिल्हा बुलढाणा या पत्यावर पत्रव्यवहार करावा. कळावे. आपले,
सह्या पांच हजार लोकांतर्फे
१. पुनाजी सोनाजी महार द. खू.
२. मोतीराम व जामा महार नि. खू
३. भावजी व रामजी महार नि. खू.
बहिष्कृत भारत, ता. १५ मार्च १९२९.