परिशिष्टे - Page 529

परिशिष्टे, . yc

(स्टैंडर्डायझेशन) लागू केल्यास आपल्यापैकी काही .जणावर बेकारीचा प्रसंग येईल. या भीतीमुळे कामगार असंतुष्ट झाले होते. त्या असंतोषाचा गिरणी कामगार युनियनच्या पुढाऱ्यांनी फायदा घेतला.

(२). मिल कमिट्या या सल्लागार कमिट्या होत, पण गिरणी कामगारसंघाने गैरसनदशीरपणाने त्यांच्या कार्यकारी कमिट्या बनविल्या. सदर मिल कमिटीतील सभासदास व्यक्तिशः संप पुकारण्यास उत्तेजन दिले. कमिटीने संप पुकारणे सनदशीर होय, पण कमिटीतील एखाद्या सभासदाने तो पुकारणे बिनसनदशीर होय. त्यांनी कामगार व गिरणीवाले यांचें दरम्यान द्वेष वाढविला, व कामगाराकडून लहान लहान संप करविले. १९२८ च्या आक्टोबरात त्यास सार्वत्रिक संप घडवून आणावयाचा होता. त्याची पूर्वतयारी त्यांनी छोट्या संपामार्फत चालविली होती. त्याप्रमाणे सार्वत्रिकं संप ठरल्या वेळेस त्यांनी पुकारलाही. गिरणीवाले व गिरणी कामगारसंघ यांची बैठक २४ एप्रिल रोजी भरली होती. पण सदर बैठकीत ज्या योगाने कामगारसंघास सार्वत्रिक संप पुकारावा लागेल अशी कोणतीही आगळीक गिरणीवाल्यांच्या प्रतिनिधींच्या हातून घडली नव्हती, त्यांनी गिरणी. कामगारसंघाची पहिली मागणी कबूल केली होती. दुसऱ्या मागणीचा विचार करण्यात ते नाकबूल नव्हते, आणि तिसऱ्या व चौथ्या मागणीपर्यंत वाटाघाट पोहचलीही नाही. आपल्या अधिकाऱ्यास गिरणीवाल्यांनी खुनशीपणाने वागविले, असे कामगारसंघास सिद्ध करता आले नाही व वाडिया मिलमधून काढून टाकलेल्या कामगारास पुनः कामावर का घ्यावे याचेही समर्पक कारण त्यास दाखविता आले नाही.

(३) ज्या भांडणामुळे संप घडून आला तशा प्रकारचे भांडण किंवा वाद गिरणीवाले. व गिरणी कामगार याजमध्ये अस्तित्वात होता की नाही, हे सांगणे कठीण आहे. भांडण किंवा वाद असलाच तर तो कामगारसंघाचे अधिकारी व गिरणीवाले यामध्ये होता व तो संघाचे अधिकारी व मिल कमिट्यांचे अधिकारी यांचे धोरण व हालचाली यामुळे उद्भवला होता. या भांडणात गिरणीवाल्यांचे धोरण स्वतःचा बचाव करणे एवढेच होते. काही बाबतीत गिरणीवाले व त्यांचे अधिकारी यांनी जितके विचारपूर्वक वागावयास पाहिजे तितके ते वागले नाहीत. तथापि दोषाचे सगळे खापर संघाच्या माथीच फुटते.

संघ का लांबला ?

(१) गिरणी कामगारसंघाच्या पुढाऱ्यांची चढाईची व खोडसाळपणाची चळवळ व कामगारास चिथावणारे लेख व भाषणे.