परिशिष्टे - Page 530

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४८८

दिलेला धाकदपटशा व संपात सामील (२) संपवाल्यांनी केलेले पिकेटिंग,

न झालेल्यांवर केलेला अत्याचार या कारणांनी संप लांबला.

अजून परत न जे संपवाले आपापल्या गावी गेले ते पावसाळां संपून आल्यामुळे गिरण्या पूर्णपणे जोरात सुरू नाहीत: संप लांबण्याचे कारणही गिरणी कामगार संघाचे अधिकारीच होत असे आमचे मत आहे.

_ गिरणीवाले व गिरणी कामगार याजमधील वाद मिटविण्यास मुख्य अडचण अशी की, गिरणी कामगारसंघाचे अधिकारी हे हटवादी आहेत. विणकरांची मजुरी ७।। टक्क्यांनी कापली याबद्दल कामगार मनातून असंतुष्ट आहेत, असे आम्हास वाटते. त्याचप्रमाणे लायकीची योजना लागू केल्यास काम जाईल की काय याची भीती व एप्रिल महिन्याचा पगार दिला नाही याही कारणामुळे कामगार असंतुष्ट आहेत, व त्याचा भरपूर फायदा कामगारसंघाने घेतला आहे. गिरणीवाले व गिरणी कामगार यांचा संबंध येण्यास काही साधन नाही व भांडण उपस्थित झाल्यास ते मिटविण्यास लवादाची स्थापना नाही. या योगाने तडजोड घडवून आणणे बिकट झाले आहे.

केसरी, ता. २१ सप्टेंबर १९२९, सारसंग्रह अर्थात्‌ केसरीचे छोटे फाईल, १९२९.

पाने ३९१-३९२.

उद्घृत : गणवीर, पृ. ५२९-५३१.