परिशिष्टे - Page 531

परिशिष्ट-१० |
पनवेल येथील गणेशोत्सव

गेल्या वर्षी गणपती विसर्जन रामकृष्ण गंगाराम भातनकर यांनीं वडाळी तळ्याचे देवघाटावर केला होता त्यावेळी तळ्याला लागून असलेल्या बल्लाळेश्वराचे देवळाच्या पंचानीं किंवा कोणत्याहि ब्राह्मणांनी अडथळा केला नाहीं. तसेंच सबंध: वर्षात कोणीही अस्पृश्यतेचा वाद उपस्थित क्रेला नाहीं, परंतु यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी सदरहू बल्लाळेश्वर देवळाचे ब्राह्मण पंचांनीं कांहीं लोकांच्या सह्यानिशी अर्ज तयार करून पनवेलच्या मामल्लेदारसाहेबांकडे पाठविला. व त्यांत त्यांनीं विनंति केली कीं, गेल्या वर्षी गणपती विसर्जन रा. भातनकर या अस्पृश्य गृहस्थानें वडाळी तळ्याचे देवघाटांवर केलें. सदरहू घाटांवर. गणपती विसर्जन करण्याची अस्पृश्यांची वहिवाट नाहीं. जर ते यंदा करतील तर शांततेचा भंग होईल. म्हणून सरकारनें बंदोबस्त करावा. इंग्रज सरकारला सैतानीं सरकार म्हणणारे ब्राह्मणांनी अखेर त्याच सरकारचें बूट चाटूपणा केला.

या अर्जावरून गांवांत पुष्कळ गडबड उडून गेली होती, देवळाचे पंच खेरीज करून सर्व हिंदुलोक रा. भातनकर यांस वडाळी तळ्याचे देवघाटांवर गणपती विसर्जन करण्यास कसलीच हरकत नाहीं म्हणून म्हणूं लागलें व त्याप्रमाणें गुजराथी, व दक्षिणी हिंदूनीं रा. भातनकंर यांस आमची कोणत्याहि प्रकारें हरकत नाहीं म्हणून सह्या दिल्या. इकडे हा प्रकार होत असतांना ता. ८-९-१९२९ रोजीं तेली लोकांचा मेळा बाजारपेठेतील मुसलमानी वस्तींतून जाऊ लागला असतां त्या रस्त्याने जाऊं नये म्हणून मुसलमानांनी अडथळा केला या प्रकारावरून सर्व हिंदूंची मनें दुखावल्यावरूम त्यांची त्याच दिवशीं सभा झालीं. सभेंत बुधवार ता. ११-९-१९२९ रोजीं सर्व मेळ्यानें जमावाने

मुसलमानांच्या वस्तीतून जावें असें ठरलें.

त्या सभेंत रा. भातनकर ह्यांना ब्राह्मण वगैरे मंडळींनी प्रश्‍न केला की, तुम्ही अस्पृश्य लोक आम्हाला मदत करणार किंवा नाहीं? भातनकरांनीं सर्व अस्पृश्यातर्फे उत्तर दिलें कीं, आम्ही हिंदुधर्माकरितां मरायला तयार आहों. तुम्ही जेव्हां हाक माराल तेव्हां आम्ही हिंदू धर्माच्या मदतीला येण्यास तयार आहो. परंतु तुम्ही आमच्या हक्काकडे दुर्लक्ष करतां कामा नये, असें म्हटल्यावर [सर्व ] [हिंदू ] [पुढारी ]