परिशिष्टे - Page 532

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४९०

दिलें आहेत. तुमचा म्हणालें कीं, आम्ही तुमचें हक्क तुम्हाला आजपासूनच

ठेवला आहे. त्याची काळजी करू प्रश्‍न आम्ही सभेला येण्यापूर्वीच सोडवून

पी. ह्यांना तारा नका. इकडे मामलेदार साहेबानीं कलेक्टर, प्रांत व डी. एस.

केल्या. त्याप्रमाणें कलेक्टर, प्रांत व डी. एस. पी. आर्मस्‌ पोलीससह येऊन हजर झालें. एक हजार अस्पृश्यबंधूही रा. भातनकरांच्या हाकेसरसे मिरवणूकीला हजर झाले. स्पृश्य-अस्पृश्य बंधूंची दहा हजार लोकांची मिरवणूक मोठ्या तोऱ्यांनें मुसलमान वस्तींतून व मशिदीवरून पार पडली. हिंदुलोक आनंदातिशयानें बेहोष झाले. परंतु अस्पृश्यांचे दुर्दैव ओढवलें ! गुरूवारी सकाळीं मामलेदार साहेबांनी १४४ कलमाखाली नोटीस काढून, ती रामकृष्ण भातनकर याजवर बजाविली. त्या नोटिशींत असें म्हटलें होतें कीं, वडाळी तळ्य़ाचे देवघाटांवरं गणपती विसर्जन करण्यास हरकत नाहीं, परंतु बल्लाळेश्वराचे देवळाच्या 'खाजगी जागेतून जाऊं नये. गेल्यास १८८ कलमाखाली खटला. भरण्यात येईल. या नोटिशींनें सर्व हिंदु विचारांत पडले व सर्वानी रा. भातनकरांना आश्वासन दिलें कीं, आम्ही सर्व लोक आज तुमच्या गणपती विसर्जनाला

येणार. तुम्ही कांहीं काळजी करूं नका. पनवेल म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष आत्मारामशेठ आटवणे यांनीं वचन दिलें कीं, जेथें अस्पृश्याच्या गणपतीचें विसर्जन होईल तेथेंच माझ्या गणपतीचे मी विसर्जन करणार. झाले संध्याकाळीं ४ वाजतां अस्पृश्यांचा बाळ सुधारक मेळा व गणपती याची मिरवणूक श्री. शिवतरकर व सुभेदार शिरावले यांच्या पुढारीपणाखालीं निघाली. _

मिरवणूकींत अस्पृश्यांचे स्थानिक पुढारी रा. बळीराम भातनकर, रामकृष्ण भातनकर, व यशवंत भातनकर, विष्णू पोशीरकर वगैर मंडळी होती. मिरवणूक

शंकरराव पत्की वकिलांच्या घरासमोर आल्यावर त्यांनी मेळ्याचें मोठ्या प्रेमानें स्वागत केलें. नंतर पत्की वकील, रेंजर गुप्ते, जोशी वकील वगैरे का. प्रभु मंडळी व मराठे व गुजराथी बंधु यासह मिरवणूक श्री. आटवणे शेठच्या घरासमोर आली. मिरवणूक त्यांच्या घरासमोर आल्याबरोबर त्यांनी बंदुकीचे बार करून

मेळ्याचें स्वागत केलें. नंतर त्यांनी आपला स्वतःचा गणपती व इतर गणपती

मिरवणूकीबरोबर घेतले. तेथें जोशी वकील वगैरे ब्राह्मंण ब्राह्मणेतर लोकांचा

समुदाय मिरवणूकीबरोबर वाढत चालला होता. शेवटीं मिरवणूक बल्लाळेश्वराच्या

देवळासमोर आल्यावर, त्या देवळाचे इंग्रज सरकारचे पायपेड भट पुराणिकशाहीचे बगलबच्चे दोन:तीन पुढें. येऊन म्हणूं लागले कीं, आपण तडजोड करूं या. तुमचा : गणपती . देवळाच्या मनाई केलेल्या जागेच्या -शेवटापर्यंत आणा. तेथें आरती

करा, आणि मग तेथून आम्ही देवघाटावर आमच्या हातानें तुमच्या गणपतीचे

विसर्जन करूं ही तडजोड रा. शिवतरकर, रा. भातनकर, जोशी आणि पत्की वकील यांनीं कबूल केली नाहीं.