परिशिष्टे — ४९१
स्पृश्य हिंदुलोक देखील ब्राह्मण पंचांचा तिरस्कार युक्त भार्षेत निषेध करू लागलें शेवटीं शिवतरकर यांनीं ब्राह्मण पंचांना स्पष्ट सांगितलें कीं, आम्ही सर्व अस्पृश्य लोक आमच्या गणपतीचें विसर्जनं तळ्यांचे देवघाटांवरच करूं. आम्ही काँग्रेसमध्ये शिरणारे व स्वराज्य मागणारे ब्राह्मण हे कोणत्या अंतःकरणाचें असतात हें जाणून: आहोत. -- म्हणून आम्ही. नासंक्या मेंदूच्या लोकांबरोबर तडजोड करूं इच्छित नाहीं. लागलीच आटवणे शेठ यांनीं होडी. मागविली; व त्या होडींत आटवणे शेठचा व रामकृष्ण भातनकर आणि इतरहि अस्पृश्यांचे गणपती व गौरी बसविल्या व देवघाटावर नेल्या. तेथें देवघाटावर गणपती होडींतून उतरल्याबरोबर सर्व feet प्रचंड टाळयांचा गजर केला, व गजानन महाराज की जय, शिवाजी महाराज को जय. डॉ. आंबेडकर महाराज की जय करुन गणपतीचें विंसर्जन केलें. नंतर अस्पृश्यांनी घरुन तयार करून आणलेला प्रसाद सर्वांना वाटला, त्यावेळीं सर्व हिंदु जनता अशिक्षित कुणबीसुद्धां देवळाचे पंच ब्राह्मणांचा धिःकांर करूं लागलीं. व म्हणू लागली की ब्राह्मण आपल्या जातीवर गेलें शि
रात्रौ पानसुंपारीचा समारंभ सर्व मेळेवालें व स्पृश्य-अस्पृश्य हिंदुबंधुकरितां ठरविण्यांत आला. पानसुपारीस मे. मामलेदारसाहेब, आटवणे शेठ, मेसर्स पत्की व जोशी वकील, वेदक, पाटील, मेघजी, बाळासाहेब पटवर्धन, गुप्ते वकील, मोहनलाल शेठ, संभू शेठ वगैरे गुजराथी व महाराष्ट्रीय [हिंदु ] [पुढारी ] हजर होतें. अस्पृश्यही महार चांभारासह PR मोठ्या जमावानिशी [होते. ] त्यावेळी मेसर्स शिवतरकर, पाटील, जोशी, गुप्ते, आटवणे शेठ व मामलेदारसाहेब [यांची ] भाषणें झाल्यावर समारंभ संपला. त्यावेळीं रा. शिवतरकर यांनीं जाहीर केलें कीं, यापुढें आंम्ही दरवर्षी गणपती विसर्जन देवघाटावरच करीत जाऊं
"बहिष्कृत भारत, ता. ४ ऑक्टोबर १९२९.