परिशिष्ट-११
पर्वती देवस्थानाच्या पंचांना विनंती
महाराष्ट्रातील सर्व देवळांच्या मालकांना व चालकांना मी केलेल्या जाहीर विनंतीस अनुसरून ठिकठिकाणाहून उत्तेजनपत्रे मजकडे da असून काही ठिकाणी माझी सूचना लवकरच प्रत्यक्षपणे अंमलात आणण्याविषयी जातीने तयारी चाललेली आहे, व यामुळे देवळांच्या बाबतीतील अस्पृश्यपणाचे निवारण पूर्णपणे चार-दोन वर्षात झाल्याविना खास राहत नाही, अशी उमेद वाटू लागलेली आहे.
खुद्द पुणे शहर व त्यालगतचा टापू यात मुख्यतः पर्वती .देवस्थानाबद्दल मोठा बोलबाला आहे. विशेषतः दरवर्षी श्रावण महिन्यातील सोमवारी या देवस्थानाचे नाव आबालवृद्धांच्या तोंडून ऐकू येत असते. पर्वती देवस्थान सार्वजनिक स्वरूपाचे असून त्याची व्यवस्था पंचामार्फत होत असते. सुदैवाने सदर देवस्थानाचे सध्याचे पंच सुशिक्षित व देशकालपरिस्थिती जाणणारे असे आहेत. हिंदूधर्मीयांमध्ये या देवस्थानाचा नावलौकिक होण्याविषयी पंचांची अहर्निश खटपट चाललेली असते, इतकेच नव्हे, तर परधर्मीय अधिकाऱ्यांचीही सहानुभूती मिळविण्यासाठी पंच मंडळी नेहमी दक्ष असते.
हिंदू समाजापैकी अस्पृश्य गणलेले पोटसमाज हिंदुधर्मीय असल्याबद्दल -पंचांना पूर्ण जाणीव आहे, असे समजण्यास हरकत नाही. पर्वतीच्या पायऱ्या चढताना एक लहानसा पीर ज्या देवस्थानच्या हद्दीत दृष्टीस पडतो व जो पंचांना सहन करवतो, ते देवस्थान व त्याचे पंच स्वधर्मीयांबद्दल असहिष्णु असण्याचा संभव दिसत नाही. अस्पृश्य समाजाची अस्पृश्यता घालवून टाकण्याविषयी सर्व राष्ट्रीय पुढाऱ्यांची जी एका सुराने विनवणी चाललेली आहे, तिचा ध्वनी प्रतिध्वनी पंचांच्या कानावर गेलेला असून त्याचा पडसाद त्यांच्या अंतःकरणात उमटत असलाच पाहिजे. सध्याची पंच मंडळी स्वार्थत्यागी, कर्मनिष्ठ व धडाडीची असल्याबद्दल त्यांची ख्याति आहे.
म्हणून, या पत्राद्वारे मी त्यांना अशी जाहीर विनंत्री करण्याचे धाडस करतो की, त्यांनी सर्व दृष्टीने पोक्त विचार करून, देवस्थानाच्या आवारात अस्पृश्यास्पृश्य भेदभाव यंदापासून नष्ट करावा, व सर्व देवस्थान व देवता सर्व हिंदुधर्मीयांना