परिशिष्टे - Page 536

परिशिष्ट-१२
_पर्वतीवरील अस्पृश्यांचा सत्याग्रह

पर्वतीच्या टेकडीवरील देवालयांत जाण्याचा अस्पृश्यांचा सत्याग्रह सुरू होणार, या बातमींमुके आक्टोबर रविवार ता. १३ रोजी सकाळपासूनच पुणें शहराच्या निरनिराळ्या भागांतील लोकांत मोठी खळबळ उडाल्याचें स्पष्ट दिसून येत होतें. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय निघत होता. रविवारी सकाळीं सात वाजण्याच्या पूर्वीच

पर्वतीच्या टेंकडीकडे लोकांचा लोंढा

चालूं लागला होता. भिकारदास गेट, चिंचेची तालीम, स्वारगेट, वगैरे शहराच्या दक्षिणेकडील विविध मार्गांनी लोकांचें थवेच्या थवे पर्वतीच्या पायन्याकड़े लोटूं लागल्यामुळें एकाद्या यात्रेसारखाच देखावा सर्वत्र दिसूं लागला. श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारीहि जेवढी गर्दी होत नसेल, तेवढी आज त्या ठिकाणीं दिसूं लागल्यामुळें आज त्या ठिकाणी कांहीं तरी विशेष प्रकार घडणार हे उघड दिसत होतेच. आठ साडेआठच्या सुमारास सुमारें दोन अडीचशें अस्पृश्य मंडळी व त्यांना सत्याग्रहाच्या कामीं अंतःकरणपूर्वक सहाय्य करणारी कांहीं अस्पृश्य मंडळीहि पर्वतीच्या पायथ्यावर धर्मशाळेनजीक जेथें एका नवीन देवालयाचें बांधकाम चालूं आहे त्याच्या पुढील पर्वतीच्या बाजूकडील खुल्या जागेंत ही मंडळी जमली होती. साडेआठ नऊ वाजण्याच्या सुमारास

अस्पृश्यांची

एक दिंडी भजनीही

लष्करहद्दींतून पर्वतीच्या पायथ्याजवळ सत्याग्रही मंडळींना मिळण्याकरितां आली. रा. थोरात, [महार] रा. लांडगे [मांग] वगैरे पंचवीस तीस मंडळी व

अस्पृश्य समाजांतील कांहीं स्त्रिया

या दिंडीसह तेथें येऊन पोहोंचल्या. वाटेंत मधूनमधून मृदंग पेटीच्या तालसुरावर भजन म्हणत व

“छत्रपति शिवाजी महाराज की जय,”

“चोखा मेळा की जय, .

असा जयजयकार करीत दिंडीने लोक पर्वतीच्या पायथ्यापाशी येऊन तेथें हजर असलेल्या सत्याग्रही मंडळींत मिळालें.