परिशिष्टे - ४९५
इकडे सत्याग्रहास विरोधी असलेले व कोणतीच बाजू न'घेतां केवळ कुतुहलपूर्वक काय प्रकार घडतो हें पाहण्याकरितां जमलेले शेकडों लोक पर्वतीच्या पायऱ्या चढून वर जात होतें. यावेळी उन्हाची तिरीप बरींच लागत होती, त्यामुळे पर्वतीच्या पायथ्याजवळील झाडाझुडपांच्या व घरांच्या सावलीतील सर्व जागा लोकांनी अगदी गजबजून गेल्या होत्या. पायऱ्यावर लोकांची रहदारी सारखी चालूच होती. वाटेंत श्रांत लोकांना बसण्याकरिता म्हणून वळणावळणांवर जेथे कायमची लोखंडी बाके ठेविलेली आहेत, त्या सर्व ठिकाणी
स्पृश्यांच्या टोळ्या जागा धरून बसून राहिल्या
होत्या. पर्वतीच्या मुख्य देवालयाकडे जाण्याकरितां दगडी नंदीजवळ जें शेवटचे वळण लागतें तेथें तर लोकांची फारच मोठी गर्दी
पर्वतीवर जाण्याचा रस्ता बंद करून
बसली होती. कोणी छत्र्या उघडून रस्त्याच्या दोन्हीं बाजूकडील बैठ्या बुरूजावर दाटीनें उभे होते, तर बरेच लोक त्या ठिकाणच्या पायऱ्यांवर खेटून बसले होतें.
पुण्याचे कलेक्टस्साहँब मि. गुल्ड, असि. कलेक्टर मि इझँकेल, रा. हसबनीस मामलेदार व आणखी काँही अधिकारी सकाळीं अगदी आधीपासून पर्वती टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील सर्व बंदोबस्त पहाण्यासाठी हजर झाले होतें. सत्याग्रह्मांना अडविण्यासाठी ट्रस्टीमंडळींनी आदल्या दिवसापासूनच
पर्वतीवरील सर्व देवालयांचे दरवाजे बंद
करून त्यांना कुलुपें लावल्यानें आंत अस्पृश्य अथवा अस्पृश्य यापैकी कोणाचाच तेथें प्रवेश होण्यासारखा नव्हता. पर्वतीवरील मुख्य जें श्री महादेवाचे देवालय त्याचे दरवाजे आंतून अगदी बंद केलेले होते. या मंदिरांतील महादेवा
_ श्रीदेवदेवेश्वर
हें नांव प्राचीन काळापासून रूढ होते. व ऐतिहासिक कागदपत्रांत याच नांवाने या देवस्थानाचा उल्लेख आढळतो, पण अलीकडे हैं. नांव मागें पडले असून पर्वतीचें देवालय याच नांवानें तें देवस्थान सामान्यतः ओळखले जातें. पर्वती टेकडीच्या माथ्यावरील सपाटीवर श्रीविष्ठलरखुमाइ, कार्तीकेयस्वामी, व श्रीविष्णू यांची जी देवालयें आहेत तींहि सत्याग्रहापूर्वीच म्हणजे शनिवारपासून अगदी बंद असून तेथे रक्षणासाठी ट्र्स्टींच्या विनंतीवरून