परिशिष्टे - Page 538

४९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

शनिवार पासून पोलिसांचा पहारा

बसलेला होता. रविवार सकाळी तर रा. पाटील फौजदार हे आणखी कांही पोलिस अधिकारी व सुमारें चाळीस पन्नास पोलिसांची तुकडी घेऊन तेथे आले. ठिकठिकाणी बंदोबस्त करीत ते हिंडत होते. नऊ वाजून सूर्य जसजसा वर चढूं लागला तसतशीं उन्हाची तिरीप अधिकच वाढू लागली व इकडे सर्व जातीच्या स्पृश्यांची गर्दीही वाढून

सुमारे तीन चार हजार .

इतका लोकसमुदाय पर्वतीवर दिसूं लागला. प्रथम यापैकी बरेच लोक पर्वती देवालयाच्या

महाद्वारापुढें गर्दी करून

बसून राहिलें व कित्येकांनीं नगारखान्याकडे जाण्याचा जो दगडी जिना आहे तोही. पूर्णपणें व्यापून टाकिला, पण कांही वेळानें पोलिस अधिकारी [तेथे ] आले [व ] त्यांनी ही |

जागा खाली करून तेथून निघून जाण्याचा हुकूम

नगारखान्याखालच्या मंडळींना फर्माविला. त्याबरोबर लोक तेथून .हळूं हळू निघून गेले व महाद्वाराच्या पुढील पायऱ्या व नगारखान्याच्या तळमजला हा मोकळा झाला. ह्या वेळपर्यंत

कलेक्टर मि. गुल्ड हे नानासाहेब पेशव्यांच्या स्मारक मंदिरापुढे

मोकळ्या जागीं झाडाच्या छायेत खुर्ची टाकून सभोवार अवलोकन करीत बसलेले होते. कलेक्टर साहेबांचे. पर्सनल असिस्टंट मि. इझीकेल, इन्स्पेक्टर मिल्स, रा. पाटील फौजदार व रा. हसबनीस मॅजिस्ट्रेट वगैर अधिकाऱ्यांचीहि येथें येजा चालू होती व त्यांची आपसात बोलणीही चालू होती. नंतर कलेक्टरसाहेब तेथून निघून मुख्य देवालयाच्या महाद्वारापुढील फरसबंदीवर आले. या ठिकाणाहून पर्वतीच्या पायऱ्यांचा मार्ग खाली बराच लांबपर्यंत दिसण्यासारखा असल्यामुळे कलेक्टरसाहेबानें उभें राहण्याकरिता ही जागा पसंत केली असावी असें वाटतें. सरकारी अधिकारी व पोलीस यांचा बंदोबस्त याप्रमाणे जय्यत होता. इकडे श्रीविष्णुच्या देवालयापुढें बंद करता येण्यासारखे दरवाजे किंवा फाटकही नसल्यामुळे