परिशिष्टे ४९७
वेळूंची दांडकी आडवी बांधून तेथील मार्ग बंद
ठेवण्यांत आला होता. त्यामुळें लोकांना आंत जातां येत नव्हतें. पण एक कुलुंगे कुत्रे मात्र बिनहरकत प्रवेश मिळून महाविष्णूच्या मंदिरापुढील फरसबंदीवर स्वस्थ बसलेले दिसत होतें. त्याला आत बसलेलें पाहून मज्जाव झालेल्या स्पृश्य लोकांच्या तोंडून कांही तरीं उद्गार निघत. कोणी म्हणें की, |
कुत्र्याला जेथे प्रवेश आहे तेथे स्पृश्यांनाहीं नसावा काय ?
तर कोणी “श्वानो युवानो मघवान' या सुत्राची आठवण करून तेथून परत फिरत. इकडे पायऱ्यांचा मुख्य रस्ता टेकडीच्या माथ्याजवळ जेथें संपतो तेथें ` लोकांची अगदी हुल्लड माजून राहिली होती व कित्येक
फोटोग्राफर आपले कॅमेरे सजवून
गर्दीचे व देवालयाच्या भागांचे निरनिराळ्या ठिकाणांहून फोटो घेण्यात गर्क झाले होते.
पर्वतीच्या पायथ्याशीं बसलेले सत्याग्रही
हे यावेळीं शांततेनें व शिस्तीने वागण्याबद्दल एकमेकांस सांगत होते. अस्पृश्य सत्याग्रहांत बरेच स्पृश्य लोकही सामील झाले होते. अस्पृश्यांच्या भजनी मेळ्याकडून सतत हरीनामाचा गजर चालू होता. रा. श्री. रा. थोरात यांच्या भजनी दिंडीने तर बहारच करून सोडली; हा एकंदर देखावा मनोरम होता मंदीरप्रवेशाविषयी उत्सुक झालेल्या अस्पृश्य बांधवांचे चेहऱ्यावर एक प्रकारचें अभिनव तेज दिसत होते.
भजनरंगानंतर भाषणांना सुरवात
झाली. रा. शिवराम जानबा कांबळे, रा. राजभोज, रा. थोरात, वगैरे अस्पृश्य पुढाऱ्यांची हृदयस्पर्शी भाषणें होऊन सर्व बांधवांना शांततेने व शिस्तीने वागण्याविषयीं त्यांनी कळकळीची विनंती कली; “आम्ही आपल्या शब्दाबाहेर बिलकूल नाही ' अशा आशयाचा आरोळ्या BAS लागल्या; रा. राजभोज यांनी आपल्या भाषणांत, सत्याग्रहाविरोधी सकट प्रभृति मंडळीचा निषेध कला; व इंगळे, लांडगे प्रभृति प्रमुख मातंग ज्ञातीतील मंडळींनी आपणांकडे एक पत्र धाडलें असून "सकट वायदंडे ' यांजवर ज्ञातीतील मंडळींचा विश्वास नाहीं असे कळविलें असल्याचें सांगितलें. नंतर रा. थोरात म्हणाले कीं, केसरीत पासष्ट . सह्यांचे तें पत्र छापलें आहे त्या खालीं माझी सही आहे; परंतु तें पत्र केसरीत छापण्याकरिता पाठविण्यात येईल असें मला वाटलें नाहीं. केवळ आमच्यांतील