आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ४९८
मी त्या सही दिली होती; पण कृपा करून वैयत्तीक मतभेदामुळें पत्रकावर
मी सत्याग्रहाचा पूर्ण पुरस्कर्ता माझ्याविषयी कोणी गैरसमज करून घेऊ नये,
झालों आहों. मी ही चळवळ आहें, मी व माझी बायको सत्याग्रहांत सामील
आहे. दुसरी आनंदाची गोष्ट यशस्वी व्हावी म्हणून दोन रुपयांची मदत करीत
बिडी मर्चंट. कीं, लष्करांतील एक गुजराथी व्यापारी छगनभाई भिकाभाई यांनी सत्याग्रहास मदत म्हणून रु. ५ ची देणगी दिली आहे. याप्रमाणे रा. थोरात यांचे भाषण झाल्यावर रा. न. वि. गाडगीळ यांचे भाषण झालें. अस्पृश्यांना सहानुभुति दाखविण्याबद्दल त्यांनी स्पृश्य मंडळीना विनंती केली. याप्रमाणे
भाषणे झालीं. :
सत्याग्रहप्रसंगी अस्पृश्य समाजांतील पुढील मंडळी हजर असलेली दिसत होती. रा. पां. ना. राजभोज, शिवराम जानबा कांबळे, मिसेस तानुबाई कांबळे व त्यांची कन्या मिसेस शेवंतीबाई ओगळे, स. कं. चे उपाध्यक्ष लांडगे, ज. स. रणपिसे, श्री. रा. थोरात, आर. के. कदम, वगैरे सुमारे २५० अस्पृश्य स्त्री-पुरूष मंडळी पायथ्याशी एकजुटीनें व शांततेने जमा होऊन उभी होती. सत्याग्रही मंडळींनी पर्वतीचा मार्ग आक्रमिण्यास प्रथम १२ लोकांची तुकडी निवडली. तींत चार स्त्रिया होत्यां, नंतर तीन तीन माणसांच्या अशा चार तुकड्या करण्यांत
आल्या, त्या पुढीलप्रमाणें :--
पहिली तुकडी
रा. गाडगीळ, राजभोज, भुस्कुटे.
दुसरी तुकडी
कांबळे यांच्या पत्नी, कांबळे यांची कन्या.
तिसरी तुकडी
कांडगे, कोथळेकर, स्वामी योगानंद.
चौथी तुकडी
ईश्वरा, भाऊ वाघचौरे, कोथळेकर यांच्या मातोश्री.
पांचवी तुकडी
पैसाफंड रानडे सर्वाच्या मागे
चालत होतें. याखेरीज रा. केशवराव जेधे, रा. रा. माधवराव श्रीपतराव
शिंदे, मजूर चे संपादक रा. लाड वगैर ब्राह्मणेतर पक्षाची मंडळीही सत्याग्रहास मदत करण्यासाठीं तेथें हजर होती. नऊ वाजण्याचा सुमार झाला तेव्हां