नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 54

१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

'हिंदूसमाजाचा आमच्यावर रोष आहेच. त्यात मुसलमान समाजाच्या रोषाची भर पडणार हे बरे नव्हे, हे आम्हांला कळत आहे. पण ज्यात आमच्या देशाचे अकल्याण आहे त्यात आमचेही अकल्याण आहे, अशी आमची भावना असल्यामुळे ही जोखीम आम्ही आमच्या शिरावर घेतली आहे. हाडाचे देशभक्त डॉ. आंबेडकरांनी यांनी त्या वेळी असा टाहो फोडला. या काळात तरवार नि लेखणी यांच्या प्रतीकाने आपल्या जीवनकार्याचा निःस्पृहपणे संदेश देणाऱ्या त्या ज्ञानी नि द्रष्ट्या पुरुषाचे बोल पुढे खरे ठरले,"

(मोतीलाल नेहरू समितीच्या शिफारशींवर लोकांच्या आग्रहास्तव डॉ. आंबेडकरांनी उपरोक्त शीर्षकाचा अग्रलेख बहिष्कृत भारतात लिहून स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त केली. तोच प्रस्तुत अग्रलेख-संपादक)

१९२८ सालच्या मे महिन्यात राजकारणात वावरत असलेल्या सर्व पक्षांच्या वतीनें स्वराज्याची घटना तयार करण्याकरितां पंडित मोतिलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यांत आली होती. या कमिटीचा रिपोर्ट प्रसिद्ध होऊन बराच काळ लोटला. रिपोर्ट प्रसिद्ध झाल्या दिवसापासून त्यावर सर्वत्र टीका चालू होती. त्या टीकाकारांत कांहीं रिपोर्टातील योजनेच्या बाजूनें व.कांही तिच्या लोकमतास चालना देत होते. रिपोर्टातील स्वातंत्र्याच्या योजनेवर फार मोठेच रण माजले होतें. शेवटीं बरीच भवति न भवात होऊन गेल्या डिसेबर महिन्यांत कलकत्ता येथें भरलेल्या काँग्रेसमध्ये सदरील कमिटीच्या योजनेत दुरुस्ती होऊन ती मान्य करण्यात आली. आम्ही मात्र या नेहरू कमिटीच्या रिपोर्टाबद्दल आमचें मत स्पष्टपणें जाहीर केलेलें नव्हतें. तरी पण त्या रिपोर्टाची होत असलेली वाच्यता आमच्या वाचकांच्या कानावर गेल्याशिवाय राहिली नाहीं. त्याचा परिणाम असा झाला कीं, आमच्या वाचकांपैकीं कांहीं जणांनी नेहरू कमिटीच्या रिपोर्टासंबंधीं तुमचे काय मत आहे, अशी पृच्छा आमच्याकडे . केली आहे. आमच्या या जिज्ञासू वाचकांची इच्छापुरी करणें हैं आमचें कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रस्तुत विषयाची चर्चा करण्याचें आम्ही योजिलें आहे.

कोणत्याही देशांतील राज्यकारभार सुरळितपणें चालण्यास त्याला कसल्यातरी प्रकारची, बरी वाईट, राज्यघटना आवश्यक असावी लागते. तिच्याशिवाय भागत नाही. आणि म्हणूनच दरेक सुधारलेल्या देशात एक तऱ्हेची राज्यघटना अस्तित्वांत असते. त्याप्रमाणें आपल्या या देशांतहि एक प्रकारची राज्यघटना प्रचलित आहे. इतकेच नव्हें, तर ज्या प्रजासत्तात्मक स्वराज्याकरितां सारे राजकारणवादी लोक कंठशोष करीत आहेत, त्याच स्वराज्याच्या कोंदणांत

१ : कीर, पृ. १२०-१२१.