परिशिष्टे - Page 541

परिशिष्टे | : ४९९ .

पर्वतीच्या तळाजवळील पायन्यांवरून जयजयकाराची गर्जना ऐकूं आली व सत्याग्रही मंडळी वर येण्यास निघाल्याचा इषारा सर्वाना त्या योगें सहजच. मिळाला. सत्याग्रहीलोक हळूं हळूं वर चढू लागले तसतशी रस्त्याच्या बाजूनें व आसपासच्या डोंगराळ भागांत उभे असलेल्या स्पृश्य लोकांच्या टोळ्यातून विरोधी गर्जना व हातवारे सुरु झाले. सत्याग्रहींची निर्भत्सना जोरानें होऊं लागली. |

ही महारें देवळांत कशी घुसतात पाहूं ति

असेही धमकावणीचे उद्गार कित्येकांच्या तोंडून निघत. असें होतां. होतां. सत्याग्रह करणारी | rr

“रा, भुस्कुटे, राजभोज, गाडगीळ, लांडगे, प्रभृति मंडळी”

दगडी पायऱ्यांचा बहुतेक मार्ग चढून वर अगदीं शेवटच्या वळणाजवळ आली व तेथें मात्र

सनातनी स्पृश्य टोळ्यांचा विरोध

फारच वाढल्यामुळें त्यांना पुढे एकही पाऊल टाकणें अशक्य झालें. सत्याग्रही लोकांना धमक्या देणाऱ्या गर्जना. निघूं लागल्या. इतकेच नव्हें तर. अंगाशीं लगट करून प्रत्यक्ष

खालीं रेटण्याचाहि सपाटा

सुरू झाला. याप्रमाणें दंगल माजतांच सत्याग्रही लोकांना वर जाण्याचा मार्ग तर अजिबात बंद झालाच, पण त्यांना त्या ठिकाणी ऊभे. राहणेही अशक्य झाले. साध्या

रेटारेटीचे रूपांतर मारहाणीत

होण्याला फारसा उशीर लागला नाहीं. कित्येक चवताळलेले सनातनी स्पृश्य सत्याग्रही (म्हणजे रा. नरहरपंत गाडगीळ व रा. विनायकराव भुस्कुटे) यांना लाथा बुक्या मारूं लागले, तर कित्येकांनी एकमेकास त्यांच्या :अंगावर ढकलण्याचा en

गांवगुडी खेळ

सुरू केला. सत्याग्रही मंडळी अत्यंत 'शांतपणानें हा प्रकार सहन करीत होती. पायऱ्यांच्या वरील बाजूस रा. नारायणराव गुंजाळ, रा. विश्वासराव डावरे, श्रीमंत आप्पासाहेब गद्रे, रा गो. पा. महाजन, रा. बाबूराव फुले, रा. गणपतराव देवधर, डॉ. जेजूरीकर, रा. झांजले, रा. नलावडे, रा. देडगांवकर