डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५००
वावरत होती. त्यांच्याच वगैरे सनातनी मताची पुढारी मंडळी इकडे तिकडे
पलिकडे दहाबारा पायन्याखालील भागांत एकच दंगल माजून राहिली होती. एकंदर परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची चिन्हें दिसूं लागली. सनातनी मंडळी रेटारेटी करून गाडगीळ, भुसकुटे, राजभोज, लांडगे यांना
पायन्यावरून खाली निवडुंगांत पाडण्याचा प्रयत्न
करीत होती. त्यावेळीं या मंडळीचा कडेलोट होणार कीं काय अशी क्षणभर भीती वाटली. पण रा. गाडगीळ व रा. भुस्कुटे हे जोरानें उठून उभे राहून पुन
सत्याग्रहाला प्रवत्त झाले. यावेळीं
देवळांतून मोठा दगड रा. राजभोजांचे खांद्यावर
येऊन धडकला. त्यामुळे ते विव्हळ झाले. निवडुंगाच्या फड्यांचाही प्रसाद सर्व मंडळीना मिळाला. पण त्याला बिलकूल दाद न देतां सत्याग्रही मंडळी सनातन्यांना तोंड. देऊ लागली. यावेळी लहान सहान दगड फेकण्यांत येत
होते.
कांही सनातन्यांनाही दगडाचा प्रसाद
मिळाला, पण तो त्यांच्याच पक्षाकडून त्यांना मिळाला. सत्याग्रही मंडळी चिकाटी सोडत नाहींत, हें पाहून सनातनी चिडल्यासारखे दिसले. यावेळी सूर्यकिरण बरेंच प्रखर होऊं लागलें होते. इतक्यांत यावेळी
रा. राजभोज हे मूर्च्छीत पडले
` असल्याची बातमी आली. त्यांना डोक्यावर, मानेवर व इतर ठिकाणीही बराच मार लागल्यामुळें त्यांना अखेरीस मूर्च्छा आली व कांही लोकांनी त्यांना
तेथून हालविण्याचा प्रयत्न केला.
देशदास रानडे
हे नेहमींप्रमाणें बोडके व अंगावर फक्त एक गादीचे वस्त्र पांघरून आले होते, व त्यांच्या उघड्या अंगावरही काठ्या, छत्र्या, दगड, विटा वगैरेचा बराच मार लागला. |
रा. न. वि. गाडगीळ
वकील यांचेवर दंगेखोर गुंडांचा विशेष रोख दिसत होता. त्यामुळे त्यांनाही बरीच मारहाण सहन करावी लागली. फेकलेले दगड लागल्यामुळें त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले, तीच दशा रा. भुस्कुटे इतर सत्याग्रहींची झाली; पण सत्याग्रहीनी ` प्रतिकार केला नाही. अभिनंदनीय शांततेनें त्यांनी तें ,सहन केलें. गुंड