परिशिष्टे ५०१
लोकांच्या घोळक्यांने सत्याग्रह्यांचा वर जाण्याचा मार्ग अजिबात बंद करून त्यांना खाली रेटण्याचा सपाटा चालविला व अखेर ही मंडळी मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजुस फुटणाऱ्या कच्च्या पायवाटेकडे वळली. पण तेथेंही मारहाण चालूंच होती. पायऱ्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा शिताफळींची बरीच झाडें आहेत व “झाडाच्या फळास कोणी हात लावूं नये, तसे केल्यास कायदेशीर इलाज केला जाईल” अशा अर्थाच्या पाट्याहि भिंतीवर लाविलेल्या होत्या तथापि त्या व्यर्थ ठरून सत्याग्रही लोकांवर दोन्हीं बाजूंनीं
कच्च्या शिताफळांचा मारा
होऊं लागला. सत्याग्रहविरोधी पक्षांतील कांही लोक मौज पहाण्याकरितां सोईस्कर जागा म्हणून आधींच झाडावर चढून बसले होते. त्यांनी जवळच्या ' फाद्यांची कच्ची कठीण शिताफकें तोडून तीं फेकण्याचा उपक्रम केला व नंतर : लौकरच दगडविटांचाही संचार आकाशांत दिसूं लागला. भगवी वस्त्रें परिधान केलेले एक |
आर्यसमाजी स्वामी योगानंद
सत्याग्रहींच्या बाजूर्ने वर चढत होते. त्यांना लोकांनी वाटेंत अडविलें व एकानें त्यांच्या डोक्याचा भगवा फेटा उडवून दिला. . त्याबरोबर स्वामी दंगलमस्ती करणाऱ्या लोकांना झिटकारून मोकळे झालें. व तेथेंच पायरीवर, न हलण्याच्या इराद्याने बैठक मारून बसले. लागलाच त्यांच्या भोवती दंगेखोरांचा गराडा पडला व त्यांतील एकजण स्वामींची समजूत घालून त्यांना फिरण्याचा सल्ला देऊ लागला. स्वामीचा निश्चय ढळेना इतक्यांत कोणी |
स्वामीना उचलून पायऱ्यांखाली लोटून दिले.
त्यामुळे ते तीन चार पायर्या घडगडत खाली गेलें व पुन्हा सांवरून वर aE लागले तोच पुन्हां त्याना कोणी
खाली ढकलून दिलें
याप्रमाणें बराच वेळ मारामारी चालली असतां पोलिस देवळाकडील भागाहून खालीं आले व त्यांनी हे प्रकार थांबविण्याचा प्रयत्न चालविला, खुद्द कलेक्टर व त्यांचे पर्सनल असिस्टंट हेंही ऐन गर्दीच्या जागीं पायऱ्यांवर आले व त्यांनी दंगेखोर लोकांची समजूत पाडून त्यांना शांत केलें. पण एके ठिकाणी शांतता करावी तर दुसरीकडे गडबड होऊन मारपीट होई असा प्रकार चालला होता. अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी |