आंबेडकर लेखन आणि भाषणे ५०२ डॉ. बाबासाहेब
रा. गांडगीळ, राजभोज प्रभूति
कचाटींतून सोडवून संगिनी धारण करणाऱ्या सात . सत्याग्रहींना दंगेखोरांच्या
आठ पोलिसांच्या संरंक्षणाखालीं वर देवळाच्या दरवाजाकडे नेले. पण तसें करण्यांच्या आधीं थोडा वेळ देवालयापर्यंतचा
पायऱ्यांचा रस्ता सार्वजनिक आहे
असा कलेक्टरचा जाहीरनामा पुकारण्यांत आला. हा रस्ता सार्वजनिक असल्यामुळें त्यावरुन जाणाऱ्या सत्याग्रहींना कोणीही प्रतिबंध करुं नये असें मे. कलेक्टरनीं जाहीर करतांच पायऱ्यावरील गर्दी हळूंहळूं कमी होऊं लागली. तथापि कदाचित अजूनही त्रास देतील अशी भीति असल्यामुळे पोलिसांच्या संरक्षणाखालीच सत्याग्रही लोकांना वर जावें लागलें. पण पोलिसांचे संरक्षण सत्याग्रही मंडळीनी मोगितलें नव्हतें. ही मंडळी वर जाऊन पहातात तों श्रीदेवदेवेश्वराच्या मंदिराचें
महाद्वार अजिबात बंद
असल्याचें त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आलें. . .तेव्हा ही मंडळी
l -. . पायरीवर साष्टांग. नमस्कार
घालून खालीं परत फिरली. रा. राजभोज फारच थकले होते, त्यामुळें गाडमीळ- यांच्या खाद्यांवर मान टाकून ते डोळे मिटून एकएक पायरी कशीबशी खाली उतरत. होते. रा. गाडगीळ व इतर मंडळींही मार लागल्यामुळें बरीच थकलेली होती
पर्वतीवरुन खाली उतरतेवेळीं सत्याग्रही मंडळीबरोबर आंठ-दहा पोलिस होते बहुधा त्यामुळेच त्यांना यानंतर लोकांकडून प्रत्यक्ष उपद्रव झाला नाही. तथापि दुतर्फा लोकांतून घिक्कारप्रदर्शन आरोळ्या मात्र एकसारख्या उठत होत्या.
याप्रमाणे राजभोज, गाडगीळ प्रभुति मंडळी खाली पायन्याशी पोहोंचल्यावर
त्यांना |
ee रा. मानुरकरांच्या मोटारीतून
cat नेण्यात आलें. रा. राजभोज यांना बराच मार लागल्यामुळें त्यांना उपचारासाठी इस्पितळात ठेवणें जरुर होतें. म्हणून
रा. राजभोज यांना पर्वतीजवळील मिशन हास्पिटलमध्यें
पोहोचविण्यात आले व रा. गाडगीळ वकील शनिवार पेठेत त्यांच्या रहात्या घरी मोटारींतूनच आले. रा. भुस्कुटे, रा. रानडे, रा. लांडगे वगैरे मंडळीही गंभीर मुद्रेने परत गेली.