परिशिष्टे ५०3
सत्याग्रहास पाठिंबा देणारी जी कित्येक मंडळी पर्वतीच्या पायथ्याजवळ बसली होती त्यांनाहि परत जातांना लोकांनी बरीच मारहाण करुन जागोजागीं बखेडा उत्पन्न केला. अस्पृश्यांच्या भजनी मेळ्याबरोबर एक तेलगू इसम आले होते. त्यांचेवर लोकांनी कालव्याच्या पुलाजवळ हल्ला करुन मारहाण केली व त्याची
बाजाची पेटी पुलाखाली फेकली
त्यामुळे तिच्या ठिकऱ्या झाल्या. सत्याग्रही मंडळी अशा प्रकारें पर्वतीहून निघून गेल्यावर पुराणमताभिमान्यांचे थवेही विजयश्रीच्या आनंदांत घरोघरी निघून जाऊं लागले. दुपारी बारा वाजल्यानंतरही पर्वतीचे दरवाजे बंदच होतें. गावांत सर्व दिवस हाच चर्चेचा विषय होऊन बसला होता,
सत्याग्रही मंडळींचे अभिनंदन .
करण्यासाठी पुष्कळ मंडळी रा. गाडगीळ, रा. भुस्कुटे, रा. राजभोज यांजकडे गेली होती. झालेला प्रकार हा सत्याग्रहाचा नैतिक विजयच होय असें या मंडळींचे स्पष्ट मत आहे. रा. राजभोज यांच्या समाचारासाठी अस्पृश्य वर्गातील मंडळी इस्पितळांत जात होती. त्यांची प्रकृती बरीच नादुरुस्त झाली आहे, पण चिंताजनक नाही. आपलें उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सत्याग्रहाची ही चळवळ यापुढेही चालूं ठेवण्याचा सत्याग्रही मंडळीचा निर्धार असल्याचें रा. गाडगीळ यांनी एका मुलाखतीत जाहीर केलें.
लष्करी पलटनी बोलाविल्या
पर्वतीच्या पायऱ्यांवर सत्याग्रही लोकांना मारपीट Yo झाली तेव्हां दंग्याचे स्वरुप अधिक भयंकर होऊन रक्तपाताचा प्रसंग येतो कीं काय अशीही भीति उत्पन्न झाली होती. कलेक्टरसाहेबांच्या हुकुमावरुन नजीकच्या पोलिस ठाण्यावरुन फोननें संदेश रवाना झाल्यामुळें सशस्त्र लष्करी पलटणीही बोलावण्यात आल्या होत्या असें कळतें. परंतु त्यांचा उपयोग करण्याची आवश्यकता न राहिल्यामुळे त्यांची परत रवानगी करण्यांत आली.
पर्वतीवर सशस्त्र पोलिसांचा पहारा.
अजून दरवाजे बंद सोमवारची परिस्थिती.
पुणें येथील पर्वतीच्या देवालयांचें महाद्वार सोमवार ता. १३ ला बंदच होतें. देवालयापुढे सशस्त्र पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. देवालयांचे दरवाजे बंद ठेवल्याचा हा तिसरा दिवस होय. असा प्रकार गेल्या १५० वर्षात कधींच झाला नव्हता. ट्रस्टीपैकी कांही मंडळी पर्वतीवर गेली होती. इतरांना
मज्जाव होता.