डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५०४
पर्वतीवर संस्थान खाजगी आहे काय १
खाजगीपणाविरुध्द खास पुरावा.
| (एका मार्मिक इतिहास संशोधकाकडून)
सध्या हा प्रश्न संस्थानच्या पंचाच्या एका लहानशा पत्रामुळे उपस्थित झाला आहे. म्हणून सरपंच श्रीमंत सरदार मुजुमदार हे एक इतिहाससंशोधक असल्याने पंचाच्या या पत्राला ऐतिहासिक दृष्टींने महत्त्व आलेलें आहे. म्हणून या प्रश्नाचा शांतपणें विचार होणें. अवश्य आहे.
रा. सरदेसाई यांची-रियासत मध्य विभाग ३ (सन १९२२ ची आवृत्ती) पृष्ठ २५७ वर पर्वती संस्थानची विस्तृत माहिती दिलेली आहे. ती पैकीं प्रस्तुत प्रकरणीं उपयुक्त तेवढी याखाली देतो :-
“ पुण्याजवळील एका सुंदर टेकाडावर
लहानसें देवस्थान पूर्वीपासून होतें
त्या ठिकाणाहून दिसणारा रम्य देखावा मनांत आणून नानासाहेब पेशव्याने तेथें एक भव्य मंदिर बांधून त्यांत देवदेवेश्वराची व चार कोपन्यांत चार लहान मंदिरें बांधून, त्यांत देवी, गणपती, सूर्य व विष्णु यांची स्थापना केली.
जुन्या पर्वताईची मुर्ती अद्यापी देवीच्या मंदिरात ठेविलेली
दृष्टीस पडते, शाहू छत्रपतींच्या पादुकाही पेशव्यार्ने देवदेवेश्वराच्या मंदिरांत ठेवल्यामुळें या पर्वतीवरील मंदिरास विशेष महत्त्व व शोभा आली.” या मंदिराच्या खर्चाचा तपशील नानासाहेबांच्या रोजनिशी भाग २ ले ३४३ यांत पुढील प्रमाणें दिला .आहे =
“खर्च रु. ९,०२०
धर्मदाय पोतांपैकी
पर्वती येथें श्री देवाच्या स्थापनेस श्री देवदेवेश्वर बाण रुप्याचा महादेव वजनतोळे ६७३४ मांडीवर मूर्ती सुवर्णाच्या, उजवीकडे गणपती, डावीकडे पार्वती वजन तोळे ६८६ बाहेर गणपती पाषाणाच्या व पार्वती भवानी ”
यांत धर्मादाय पोतांपैकी
असा स्वच्छ तपशील आहे आणि धर्मादाय पोत म्हणजे खाजगी नव्हें हें कोणीही सांगेल. अशा स्थितीत नानासाहेबांच्या खाजगींतून हें मंदिर बांधले