परिशिष्टे . ५०५.
असें इतिहाससंशोधक व भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस श्रीमंत मुजुमदार हे कोणत्या आधारावर म्हणतात हें त्यांनी जाहीर करावें, श्री. मुजुमदारास अनुकुल असा पुरावा त्यांच्या मंडळांत नवीन तयार तर होत “नाहींना !
दुसरें, पर्वतीवर पूर्वीचें एक मंदीर होतेंच व त्या मंदीरांतील देवी अद्यापिहीं तेथे आहेच. ती देवी तर नानासाहेबांची खाजगी नाहीं ना ! मग तिच्याही “दर्शनास पंच “कसे प्रतिबंध घालूं शकतात ? सारांश पंचाची ही निव्वळ "दांडगाई आहे व ती जनतेनें चालू देतां उपयोगी नाहीं.
बहिष्कृत भारत, ता. १५ नोव्हेंबर १९२९.