परिशिष्टे - Page 548

परिशिष्ट-१ 3
वज्रसूची

भारतीय विद्वान भदन्त अश्वघोष यांनी रचलेल्या ' सौन्दरनन्द ' महाकाव्यातील पुष्पिकेत उपलब्ध ' आर्यसुवर्णाक्षीपुत्रस्य साकेतस्य भिक्षोराचार्य भदन्तास्वाघोषस्थ महाकवेर्महावदिनः कृतिरियम्‌ ' या उल्लेखावरुन तो साकेतनिवासी सुवर्णाक्षीचा पुत्र असून महान तार्किक विद्वान महाकवी असा बौद्धभिक्षू होता असे निःसंदिग्धपणे

म्हणता येते.

अश्वघोषांचा काळ व कालिदासावर प्रभाव

दार्शनिक परंपरेमध्ये त्यांचे नाव आचार्य नागार्जुन आणि आर्यदेव ह्यांच्याही आधी येते. चीनी परंपरा चरकाला कुषाण राजा कनिष्काचे चिकित्सा-गुरु आणि महाकवी अश्वधोषांना धर्मगुरु मानते. म्हणजेच अश्वघोष हे कनिष्कांचे समकालीन होते. कनिष्कांचा काळ इ.स. ७८-१०१ मानला जातो. कनिष्काच्या शासनकाळात काश्मिर मधील कुण्डलवन नावाच्या विहारात चवथी बौद्धसंगीती आयोजिली होती. या संगीतीचे उपाध्यक्षपदी महाकवी अश्वघोष विराजमान झाले होते. तीत त्रिपिटकावर लिहिल्या गेलेल्या विभाषाशास्त्राच्या संपादनकार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अश्वघोषांचा कालनिर्णय अत्यंत विवाद्य ठरला आहे. अश्वघोषाचा कालनिर्धारित करताना महाकवी कालिदासाचा विचार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकताच येत नाही. समय ठरवताना या दोहोचेही पौर्वापौर्वत्य दत्त म्हणून समोर उभे ठाकते. बव्हंशी पाश्चात्य व भारतीय विद्वान भदन्त अश्वघोष हे कालिदासापुर्वीच होऊन गेल्याचे सिद्ध करतात. डॉ. जॉन्सटनच्या मते, अश्वघोष पहिल्या शतकाच्या पूर्वार्धात होवून गेल्याचे दिसते. म.म. मिराशींनी आपल्या संशोधन मुक्तावलीत अश्वघोषाचे कालिदासपूर्वत्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर कालिदासावर अश्वघोषांचा प्रभाव कसा पडला तेही सप्रमाण सिद्ध करुन अनेकविध साम्यस्थळेही दाखविली आहेत. ते लिहितात, ' कालिदासाने अश्वघोषाच्या काव्याचा चांगलाच अभ्यास केलेला दिसून येईल. या अभ्यासामुळे रमणीय कल्पना व काही विशिष्ट लकबाही कालिदासाच्या काव्यात आलेल्या दिसतात.' या विधानाच्या पुष्टयर्थ ते काही उदाहरणे उद्धृत करुन पुन्हा लिहितात, ` अश्वघोषाचे दोष टाळून व मधुरवृत्तीने त्याच्या काव्यातील चांगला असाच भाग घेऊन कालिदासाने आपले