परिशिष्टे - Page 549

परिशिष्टे ५०७

ग्रंथ रचले,' (पृष्ठ ४०) केवळ अश्वघोषाचेच कालिदासाने अनुकरण केले, एवढेच .नुसते सिद्ध करुन डॉ. मिराशी थांबले नाहीत, तर शेंबवणकरांच्या, “अश्वघोषाने कालिदासाचे अनुकरण केले "या मताचे उपहासपूर्वक खंडन करीत म. म. मिराशींनी डॉ. सुशीलकुमार डे यांच्या मताचा नजराणा पुढे केला तो असा, ‘To argue that Ashvaghosha is later than Kalidas is to presume without sufficient reason a retrogressive phase in literary evolution (The History of sanskrit literature page-124) म्हणजेच कालिदासानंतर अश्वघोष होऊन गेला असे म्हटल्यास वाडःमयीन उत्क्रान्तीत पुच्छप्रगती झाली असे पुरेसे कारण नसताही म्हणावे लागेल. प्रा. सुर्यनारायण चौधरी यांचेही मत यादृष्टीने विचारणीय आहे. ते म्हणतात, “बौद्धभिक्षू होने के सिवा अश्वघोष वाल्मीकि व कालिदास के कोटिका कवि था | काव्य विकास के क्रम में वह वाल्मिकि के बाद और कालिदास के पहले आता है । काव्य में जिस तरह वह वाल्मीकि का ऋणी और उत्तराधिकारी था वैसेहि कालिदास भी उसका ऋणी था ।' (बुद्धचरित पृ. ६)

प्रो. काँवेलच्या मते देखील कालिदासानेच अश्वघोषाचे अनुकरण केले. किथच्या मते तर केवळ कालिदासच नव्हे तर कवी नाटककार भास देखील अश्वघोषचे

उत्तराधिकारी होते.

मदन्त अश्वघोष काव्यसंगीतशास्त्रप्रवीण असा अनन्यसाधारण बौद्धधर्म प्रसारक होते. चीनी प्रवाश्यांच्या वृत्तान्तावरुन स्पष्ट कळते की, त्याचे स्वतःचे एक संगीत मंडळ होते आणि ते संगीत मंडळ चौकाचौकातून व बाजारहाटातून बौद्ध धर्मविषयक गुढातिगूढ सिद्धांतांना काव्यरुप देऊन अत्यंत मधुर आवाजात लय आणि रागांची संगत लावून गात फिरत असत. त्यासाठी त्यांनी एकतारीसारखे वाद्य वापरात आणले होते. त्यांची गायन शैली इतकी आकर्षक आणि गोड होती की श्रोते देहभान विसरत आणि त्यांचे हृदय उचंबळून येत असे. श्रोत्यांच्या मनावर होणारा अश्वघोषाच्या गंभीर प्रवचनाचा प्रभाव वर्णितांना सियुकी

(Si-Yu-K1) म्हणतात. ‘Ashavaghosha preached so eloquently that the entire congregation was mdved to tears’. श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. त्यांचा उपदेश ऐकूण भदन्त अश्वघोषाच्या बहुश्रुततेबद्दल बीलच्या ग्रंथात गौरवपूर्ण उल्लेख आढळतात. त्यावरुन त्यांची विविध शास्त्रपारंगतता प्रत्ययास येते. त्याला चुंबकीय वकृत्वशैलीची जोड मिळाली होती. केवळ माणसेच काय घोडे देखील त्यांचे प्रवचन चालले असताना आवाज (घोष) करीत नसत. त्यामुळे त्यांना अश्वघोष हे सार्थक नाव प्राप्त झाले असे मानले जात

असे.