परिशिष्टे - Page 550

५०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अश्वघोषांची ग्रंथसंपदा

या महाकाव्या- कविकुलगुरु अश्वघोर्षानी ' बुद्धचरित ' आणि ' सौन्दरनन्द ' दोन

' जातीभेदविध्वंसक ' व्यतिरिक्त ' महायान श्रद्धोत्पादनसंग्रह वा शास्त्र ',

“ वज्रसूचि ', ` सारिपुत्रप्रकरण ', “ सूत्रालंकार ' आणि ` गाण्डिस्तोत्रगाथा ' ह्या ग्रंथांची रचना केली आहे. सुत्रालंकारात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान सुलभ व हृदयंगम करण्यासाठी समग्र जातककथा आणि अवदान कथांचे संकलन केले

आहे.

वञ्रसूची

हिऱ्याच्या सुई प्रमाणे म्हणजेच डायमंड निडल प्रमाणे सूक्ष्म दृष्टीने संचलित होत असल्यामुळे ह्या ग्रंथाला वज्रसूची असे म्हणतात. वच्रच्छेदिका किंवा वञ्रसूचिकोपनिषद ह्या नावांनी सुद्धा या ग्रंथाला ओळखतात. वर्णाश्रम व जातीभेदाचे समर्थकांना ही कृती रुतणाऱ्या सुईप्रमाणे अत्यंत त्रस्त करीत असते. कारण यात वर्णव्यवस्था व जातीभेदाचे भयंकर खतरनाक पद्धतीने “पोस्टमार्टम ' केले आहे. अठराशे एकोणतीस साली 'वञ्रसूची'चे बी. एच. हॉडसन यांनी भाषांतर केले आणि नंतर डॉ. एल. विल्किसन यांनीं १८३९ साली सर्वप्रथम वज्रसूचीचे संपादन केले. ह्या ग्रंथाचा मुख्य हेतू विशद करताना प्रो. संघसेन सिंह म्हणतात. “इस ग्रंथ का मुख्य उद्देश जन्म के आधार पर चातुर्वर्ण्यव्यवस्था का खंडन करना मालूम होता है । ग्रंथकार यह भी कहता है कि चार वर्ण तो “ कर्मक्रिया विशेष? के आधारपर बनाए गए न कि जन्म के आधारपर; वह शील कि प्रधानता पर बडा जोर देता है ।” अर्थात चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर मर्मान्तक प्रहार करून महाकवी अश्वघोषांनी समता व मानवतेचा पुरस्कार केला आहे. वैदिक धर्मग्रंथामधून आवश्यक ती प्रामाणिक उद्धरणे घेऊन ब्राह्मण्यवर्चस्वाचे अगदी तर्कशुद्ध पद्धतीने यात बिनतोड खंडन केले आहे. या ग्रंथात औदार्यपूर्ण दृष्टीने अखिल मानव जातीचा एकात्मता व कल्याणकारक समतेचा विचार समर्थपणे प्रतिपादिला आहे. त्यामुळेच पाश्‍चिमात्य देशातील

विद्वानांनी हा ग्रंथ डोक्यावर घेतला आहे. पाश्चात्य समीक्षक या ग्रंथातील समताभावनेच्या समर्थनामुळे यावर अगदी मोहित झाले आहेत. अशा या अनन्यसाधारण ग्रंथाचे महात्म्य वर्णन करताना डॉ. द्विवेदी लिहितात, ' ब्राह्मण

धर्म की मान्य वर्ण व्यवस्था एवं जातिभेद की विचारधारा का उसमें अत्यंत बुद्धिमत्ता एवं युक्तिसे खंडन किया गया है, जो वस्तुतः स्वाभाविक भी है | कारण यह है कि सभी दृष्टी यों, जीवन-मरण, सुख-दुःख, हानि-लाभ आदि में,

जब समग्र मानव समान है, तो फिर उन्हें समानाधिकार से वंचित करना कहाँ